अनिल कांबळे
नागपूर,
Ravindra Kumar Singhal बाल न्याय मंडळाने अल्पवयीन आराेपीविरुद्ध कठाेर भूमिका घेणारा ऐतिहासिक निर्णय देत नागपूर येथील दाेन हत्याकांडात सहभागी असलेल्या 17 वर्षीय आराेपीला ‘प्राैढ’ म्हणून न्यायालयीन खटला दाखल करण्याचे आदेश दिले आहे. प्रमुख दंडाधिकारी बी.एम.काेठावले आणि सदस्य वी.आर.पंधारे यांनी हा निर्णय दिला. केअर अँड प्राेटेक्शन ऑफ चिल्ड्रन कायदा, 2015 मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीअंतर्गत नागपूरमधील हा पहिल्यापैकी निर्णय ठरला आहे.
कळमना ठाण्यांतर्गत उधारीच्या पैशांवरून असलेल्या वादात ताहीर उफर् बाबा जाकीर खान (22) रा. गुलशननगर, कळमना, या तरुणाची हत्या झाली हाेती. तपासात या हत्याकांडातील मुख्य आराेपी हा अल्पवयीन असून त्याने एखाद्या सराईत प्राैढ गुन्हेगाराप्रमाणे सुनियाेजितरित्या कट रचून ही हत्या केल्याचे समाेर आले. पाेलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. घटनेचा सखाेल तपास करून आराेपीविरुद्ध न्यायालयात प्राैढ गुन्हेगाराप्रमाणे खटला चालण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले.
त्यामुळे कळमना Ravindra Kumar Singhal पाेलिसांनी पाेलिस उपायुक्त निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनात आराेपीविरुद्ध सबळ पुरावे गाेळा करून आराेपीवर प्राैढ गुन्हेगाराप्रमाणे खटला चालविण्याची मागणी बाल न्यायालयाकडे केली. न्यायालयाने आराेपीच्या मानसिक चाचणीचा वैद्यकीय अहवाल आणि पाेलिसांनी सादर केलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारावर आराेपी हा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असला तरी त्याची मानसिकता ही प्राैढ गुन्हेगाराप्रमाणे असल्याचे निरीक्षण नाेंदवत त्याच्यावर प्राैढ गुन्हेगाराप्रमाणेच खटला चालविण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशांमुळे गंभीर गुन्ह्यांत सामील अल्पवयीन आराेपींवर प्राैढ गुन्हेगारांप्रमाणे खटला चालविण्याचा मार्ग माेकळा झाला. पाेलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनात डीसीपी निकेतन कदम आणि कळमन्याचे ठाणेदार प्रविण काळे यांच्या मार्गदर्शनात तपास अधिकारी निवृत्ती फळ यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
न्यायालयाचा हा निर्णय कळमना पाेलिसांच्या काटेकाेर तपासाचे फलित आहे. गंभीर गुन्ह्यांत सहभागी हाेणाèया अल्पवयीनांना आता कायद्याची भीती वाटेल, हा निर्णय त्यांच्यासाठी इशारा ठरेल. अशा कठाेर कारवाईमुळे समाजात बाल गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवता येईल
- निकेतन कदम, पाेलिस उपायुक्त