शिवसेना उबाठाचे तहसील कार्यालयासमोर आंदोलन

    दिनांक :12-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा

वणी,
Shiv Sena तहसील कार्यालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने शेतकरी प्रश्नांवर 7 ऑक्टोबर रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व खासदार संजय देशमुख व आमदार संजय देरकर यांनी केले. या प्रसंगी पक्षाच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाèयांना निवेदन देऊन राज्य सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या सादर केल्या.
 

Shiv Sena 
राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा. कापसाला 15000 रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा. सोयाबीनला दहा हजार रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळावा. शेतकèयाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी. 6 सप्टेंबरला शिवसैनिकांवर दाखल गुन्हे मागे घ्यावे, अशा मागण्या करण्यात आल्या.यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून सरकारविरुद्ध रोष व्यक्त केला. आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाèयांमार्फत शासनाकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.