सर्पमित्राने दिले अजगराला जीवदान

जीवनसृष्टी बहुउद्देशिय सामाजिक संस्थेचा पुढाकार

    दिनांक :12-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
मारेगाव,
Jivansrushti Social Organization तालुक्यातील किन्हाळा येथे महेश परचाके यांच्या शेतात गुरुवारच्या सकाळच्या सुमारात शेतमालक यांना मोठा अजगर दिसला. त्यांनी जीवनसृष्टीचे सामाजीक बहुउद्देशिय संस्थेचे सभासद सर्पमित्र रोहित इनामे व अनिकेत काकडे यांना बोलावून अजगराला पकडून वनविभागाच्या सहकार्याने वनक्षेत्रात सोडून जीवनदान दिले.
 

Jivansrushti Social Organization  
जीवनसृष्टी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरीश कापसे यांच्या मार्गदर्शनात उपविभागातील ज्या ठिकाणी साप आढळते त्या ठिकाणी सर्पमित्र तातडीने कुठलाही मोबदला न घेता साप अजगरांना जीवनदान देण्याचे कार्य करतात. त्यामुळे शेतात काम करणारे शेतकरी व शेतमजूर यांना सापापासून संरक्षण व पर्यावरण संवर्धनास मदत होते. अशीच घटना मारेगाव तालुक्यातील किन्हाळा या गावातील महेश परचाके यांच्या शेतात गुरुवारला 10 फुट लांबीचा मोठा अजगर आढळला तातडीने परचाके यांनी सर्पमित्र रोहित इनामे व अनिकेत परचाके यांना पाचारण करून अजगरला अलगद पकडून वनविभागाला सुचना देत वनअधिवासात अजगराला जीवदान देण्यात आले.