जिल्हा परिषदेवर राहणार महिलांचे वर्चस्व

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
चंद्रपूर,
Chhindwara district council election जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीकरिता सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन येथे जिल्हा परिषदेच्या 56 गटासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील 8 पैकी 4, अनुसूचित जमाती प्रवर्गातील 13 पैकी 7, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील 15 पैकी 8 आणि सर्वसाधारण प्रवर्गातून 20 पैकी 9 अशा एकूण 56 पैकी 28 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहे.
 

Chhindwara district council election 
विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष पद अनुसूचित जाती महिला राखीव असल्याने ही संधी गोंडपिपरी, चंद्रपूर, चिमूर, राजुरा तालुक्यातील निवडून येणार्‍या महिलेला मिळणार आहे. आजच्या आरक्षण सोडतीतून पुन्हा एकदा महिलांचे वर्चस्व दिसून आले आहे.
जिल्हा परिषद गटांच्या आरक्षणात चिमूर तालुक्यातील आंबोली-सावरगाव अनुसूचित जमाती महिला, शंकरपूर-डोमा अनुसूचित जाती महिला, नवतळा-नेरी अनसुचित जमाती, गदगाव-खडसंगी अनुसूचित जमाती महिला, मासळ बु.-पळसगाव अनुसचित जमाती, नागभीड तालुक्यातील कानपा-मौशी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, पारडी-बाळापूर बुज. नागरिकांचा मागास प्रवर्ग, गोविंदपूर-तळोधी बा. सर्वसाधारण महिला, गिरगाव-वाढोणा सर्वसाधारण, ब्रम्हपुरी तालुक्यातील नान्होरी-अर्‍हेर नवरगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग, पिंपळगाव-मालडोंगरी नागरिकांचा मागास प्रवर्ग, खेडमक्ता-चौगाण सर्वसाधारण, गांगलवाडी-मेंडकी सर्वसाधारण, आवळगाव-मुडझा सर्वसाधारण, सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव-पळसगाव जाट सर्वसाधारण महिला, गुंजेवाही-सरडपार नागरिकांचा मागास प्रवर्ग, रत्नापूर-शिवणी सर्वसाधारण, मोहाळी नले-वासेरा अनुसूचित जमाती महिला, भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा-मुधोली अनुसूचित जमाती महिला, मांगली-नंदोरी सर्वसाधारण, कुचना-शिवजीनगर अनुसूचित जाती, कोंढा-घोडपेठ नागरिकांचा मागास प्रवर्ग,वरोडा तालुक्यातील खांबाडा-चिकणी सर्वसाधारण महिला, टेमुर्डा-आबमक्ता अनुसूचित जमाती, नागरी-माढेळी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चरुरखटी-सालोरी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, शेगाव बु.- बोर्डा सर्वसाधारण, चंद्रपूर तालुक्यातील दुर्गापूर अनुसूचित जाती महिला, जुनोना अनुसूचित जमाती कोंडीमाल अनुसूचित जाती, पडोली-अनुसूचित जाती, नकोडा-नागरिकांचा मागास प्रवर्ग, मूल तालुक्यातील राजोली-मारोडा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, जुनासुर्ला-बेंबाळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, चिचाळा मो-सुशी दाबगाव सर्वसाधारण, सावली तालुक्यातील अंतरगाव-निमगाव सर्वसाधारण महिला, पाथरी-व्याहाड खुर्द नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, बोथली-कवठी सर्वसाधारण, व्याहाड बु.-हरांबा सर्वसाधारण, पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द-केमारा अनुसूचित जमाती, चिंतलधाबा-घोसरी सर्वसाधारण महिला, गोंडपिपरी तालुक्यातील करंजी-खराळपेठ सर्वसाधारण महिला, विठ्ठलवाडा-भंगाराम तळोधी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तोहगाव-धाबा अनुसूचित जाती महिला असे आरक्षण जाहिर झाले आहे. तर बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-बामणी सर्वसाधारण महिला, पळसगाव-कोठारी सर्वसाधारण महिला, कोरपना तालुक्यातील भोयगाव-आवाळपूर सर्वसाधारण, उपरवाही-नांदा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, वनसडी-कोडशी बु. सर्वसाधारण महिला, परसोडा-येरगव्हाण अनुसूचित जमाती महिला, जिवती तालुक्यातील चिखली बु.-शेणगाव अनुसूचित जमाती महिला, येल्लापूर-कुंभेझरी अनुसूचित जमाती, राजुरा तालुक्यातील गोवरी-धोपटाळा अनुसूचित जाती महिला, चुनाळा-विरूर स्टेशन अनुसूचित जाती, रामपूर-पाचगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, देवाडा-भेंडवी अनुसूचित जमाती महिला असे आरक्षण घोषीत करण्यात आले आहे.
 
 
प्रारुप आरक्षणाची अधिसुचना जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांच्या माहितीसाठी 14 ऑक्टो 2025 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या प्रारुप आरक्षण अधिसुचनेस ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी जिल्हाधिकारी/ तहसील कार्यालयात 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सादर कराव्यात. या तारखेनंतर आलेल्या हरकती विचारात घेण्यात येणार नाही, असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.