डॉ. आंबेडकर महाविद्यालयात भौतिकशास्त्र सोसायटीचे उद्घाटन

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Dr. Ambedkar College डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विभागात "भौतिकशास्त्र सोसायटीचा उद्घाटन व प्रतिष्ठापना सोहळा" उत्साहात पार पडला. विभागप्रमुख डॉ. ए. एन. वझलवार यांनी विद्यार्थी-चालित उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. प्राचार्या डॉ. दीपा पान्हेकर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
 
dr
 
 
मुख्य अतिथी म्हणून प्रा. प्रबोध देशमुख यांनी “मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीमध्ये भौतिकशास्त्राची भूमिका” या विषयावर विचार मांडले.Dr. Ambedkar College  त्यांनी भौतिकशास्त्रातील शोधांचा इतिहास, तांत्रिक नवोपक्रम आणि सर सी. व्ही. रमण यांच्याशी झालेल्या संस्मरणीय भेटीचा अनुभव शेअर केला.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. अमित बनसोड, डॉ. नम्रता प्रज्ञाकर व डॉ. प्रीती वाकुडकर होते.या प्रसंगी ३० विद्यार्थी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यात प्रांजल गाणेर (अध्यक्ष), यशश्री मोरे (उपाध्यक्ष), हर्षलता गावटे (सचिव) आणि आस्था भोसकर (कोषाध्यक्ष) यांचा समावेश आहे.
सौजन्य:प्रफुल ब्राम्हणे,संपर्क मित्र