चालकाला अचानक आला झटका, ९ वाहनांना चिरडले, बघा थरारक VIDEO

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
बंगळुरू,
driver-suddenly-crushed-vehicles-bangalore बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. बीएमटीसी (बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन) ची बस अचानक नियंत्रणाबाहेर गेली आणि एकूण नऊ वाहनांना जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, बस चालकाला अचानक झटका आला आणि त्याने चुकीने अ‍ॅक्सिलरेटर दाबल्यामुळे हा अपघात घडला. या झटक्यामुळे बस अनियंत्रित झाली आणि सलग अनेक वाहनांवर आदळली. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे, ज्यात चालकाला झटका बसल्याचे आणि बसचा वेग वाढत राहिल्याचे स्पष्ट दिसते.
 
driver-suddenly-crushed-vehicles-bangalore
 
या वेळी कंडक्टर पुढे धावत गेला आणि बस थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वेळेत नियंत्रण मिळवता आले नाही. परिणामी बसने ऑटोरिक्षा, कार आणि दुचाकीसह एकूण नऊ वाहनांना धडक दिली. driver-suddenly-crushed-vehicles-bangalore अपघातात एका ऑटोरिक्षा चालकाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. क्यूबन पार्क वाहतूक पोलिसांनी बसचालकाला ताब्यात घेतले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. प्रशासनाने सांगितले की सर्व जखमींवर उपचार सुरू आहेत आणि अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.
सौजन्य : सोशल मीडिया 
दरम्यान, शहरात आणखी एका दुर्दैवी घटनेत, एका ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. राजाजीनगरमधील पंचजन्य विद्यापीठ शाळेजवळ हा अपघात घडला. भुवना असे त्या मुलीचे नाव असून ती आपल्या दोन बहिणींसोबत रस्ता ओलांडत असताना बीएमटीसी बसने तिला जोरदार धडक दिली. driver-suddenly-crushed-vehicles-bangalore धडकेमुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून पसार झाला असून, पोलिसांनी त्याच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल करून तपास सुरु करण्यात आला आहे.