लोक कल्याण समितीमार्फत शिवण वर्गाचा शुभारंभ

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
नागपूर,
Lok Kalyan Samiti राष्ट्रसेवक संघ लोक कल्याण समितीमार्फत अजनीभागातील वैशाली नगर सेवा वस्ती येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी शिवण वर्गाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला महानगर सेवा प्रमुख संजय जोगळेकर, वृषाली वैद्य आणि सुजाता सरागे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या शिलाई वर्गामध्ये एकूण १० लाभार्थी महिला सहभागी असून, विशाखा पांडे या मार्गदर्शक म्हणून कार्य पाहणार आहेत. महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी आणि कौशल्यविकासासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
 
Lok Kalyan Samiti
 
कार्यक्रमास भाग सेवा प्रमुख प्रकाश तांबोळी, पद्माकर साठे, सुशांत वाघ आणि अपूर्वा थेमदेव आदी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेकांचे मोलाचे सहकार्य लाभले. Lok Kalyan Samiti विशेषतः जगर यांच्या योगदानाचे कौतुक उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र