कारंजा पंचायत समिती गण आरक्षण सोडत जाहीर

८ जागा महिलांसाठी राखीव

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
कारंजा लाड,
karanja panchayat samiti तालुयातील आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरलेली गण आरक्षण सोडत सोमवारी १३ ऑटोबर रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समिती सभागृहात पार पडली. उपविभागीय अधिकारी कैलास देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी ही आरक्षण सोडत जाहीर केली. यावेळी नायब तहसीलदार विनोद हरणे,अनिल वाडेकर आणि लक्ष्मण बनसोडे यांची उपस्थिती होती. या सोडतीत तालुयातील १६ गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यापैकी ८ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. काही ठिकाणी आरक्षण बदलल्याने काहींचा हिरमोड झाला, तर काहींनी याला आपले राजकीय भाग्य उजळल्याचे स्वरूप दिले.
 

karanja panchayat samiti  
लोकसंखेच्या उतरत्या क्रमानुसार चक्राकार पद्धतीने काढलेल्या या सोडतीत महिलांसाठी, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती आणि सर्वसाधारण प्रवर्गांसाठी जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार अनुसूचित जाती महिलांसाठी बेंबळा आणि मोहगव्हाण तर भामदेवी अनुसूचित जाती करिता आरक्षित आहेत. शेलू बुद्रुक गण अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव जाहीर करण्यात आला. नामाप्र महिलांसाठी बेलखेड आणि उंबर्डा बाजार तर कामरगाव आणि येवता नामाप्र साठी राखीव आहेत. किन्ही रोकडे, मनभा, शहा हे सर्वसाधारण महिला तर धनज बुद्रुक, जांब, काजळेश्वर,पोहा आणि धामणी हे सर्वसाधारण प्रवर्गकरीता आरक्षित आहेत. मयूर रामेश्वर राठोड या मुलाच्या हस्ते महिला आरक्षण चिठ्ठीद्वारे काढण्यात आले. या सोडतीमुळे कारंजा तालुयातील राजकीय वातावरणात एकदम चैतन्य आणि हालचाल निर्माण झाली आहे.
काही विद्यमान सदस्यांचे गण बदलल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, तर नव्या चेहर्‍यांना मोठी संधी मिळाली आहे. या सोडतीनंतर तालुयात पंचायत समिती निवडणुकीचा औपचारिक शंखनाद झाला आहे. कारंजा तालुयातील पंचायत समिती निवडणूक आता राजकीय पुढार्‍यांसाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. आरक्षणानंतरचे बदल हे अनेकांच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.आरक्षण सोडत प्रक्रिया शासनाच्या नियमांनुसार आणि पूर्ण पारदर्शकतेने पार पडली. सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आणि कोणतीही वादग्रस्त परिस्थिती उद्भवली नाही. ही समाधानाची बाब आहे.
कुणाल झाल्टे, तहसीलदार