नागपूर,
Maha Metro महा मेट्रो नागपूर आणि कामठी नगर परिषद दरम्यान कामठी परिसरातील विविध भूखंडांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालक मंत्री बावनकुळे आणि महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या प्रसंगी संचालक (स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग) अनिलकुमार कोकाटे, राजीव त्यागी तसेच मेट्रो आणि राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महा मेट्रोचे कार्यकारी संचालक (मालमत्ता विकास) संदीप बापट, कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी विनोद जाधव यांच्यात उपस्थितित हा करार या सामंजस्य करारानुसार शुक्रवारी मार्केट, कामठी (एपीएमसी मार्केट), नीलम लॉनचे पुनर्विकास प्रस्तावित आहे.
करारानुसार, महा मेट्रो प्राथमिक सर्वेक्षण करून डिझाईन प्रक्रियेसाठी आवश्यक माहिती संकलित करेल. महा मेट्रो, कामठी नगर परिषदेच्या पूर्वसंमतीने, प्रस्तावित प्रकल्पांचे डिझाईन्स, आराखडे, खर्चाचा अंदाज आदींचा समावेश असलेला आरएफपी तयार केल्या जाईल. हा प्रकल्प पीपीपी तत्वावर महा नागपूरकडून राबविण्यात येणार आहे.