मानोरा पं.स.सह आठ जि. प. सर्कलची आरक्षण सोडत जाहीर !

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
मानोरा,
manora zilla parishad मानोरा तालुयातील ८ जिल्हा परिषद गटातील सदस्य पदाचे आरक्षण १३ ऑटोबर रोजी वाशीम येथे जाहीर करण्यात आले. या जाहीर झालेल्या आरक्षणाने अनेकांना धक्का बसला असून कही खुशी कही गम चे वातावरण निर्माण झाले आहे. आरक्षण एकदाचे जाहीर झाल्याने आता इच्छुक उमेदवारांच्या राजकीय हालचालींना वेग येणार आहे.

manora zilla parishad
तालुयात एकूण ८ जिल्हा परिषदेचे गट असुन १६ पं. स. गण आहेत. यापैकी इंझोरी जिप गट सर्वसाधारण महिला, कुपटा नामाप्र (महिला), तळप बु. सर्वसाधारण, आसोला खु सर्वसाधारण महिला, गिरोली नामाप्र, शेंदुरजना अनुसूचित जमाती, फुलउमरी सर्वसाधारण, पोहरादेवी सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे. निवडणुकीचे दिवाळीत फटाके आता फुटणार असून येत्या काळात गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापणार उपविभागीय अधिकारी देवरे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार डॉ.संतोष यावलीकर यांच्या उपस्थितीत तालुयातील १६ पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत तहसील कार्यालयात काढण्यात आले. यामध्ये आसोला खुर्द ना.मा. प्र.महीला, कोंडोली ना. मा. प्र., गिरोली सर्वसाधारण, साखरडोह एस.सी., शेंदूरजना एस.टी, पाळोदी सर्वसाधारण, फुलउमरी सर्वसाधारण महीला, भुली सर्वसाधारण महीला, पोहरादेवी सर्वसाधारण, आमकिन्ही ना.मा. प्र. महीला,तळप बु. एस.टी. महीला, देऊरवाडी ना.मा. प्र., कुपटा ना.मा.प्र. महीला, धामणी एस.सी. महीला, इंझोरी सर्वसाधारण, दापुरा बु. सर्वसाधारण महीला असे १६ गणाचे आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले आहे. या वेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी,पत्रकार,नागरिक उपस्थित होते.