‘मिशन नाईट वॉच’ : आता गुन्हेगारांची झोप उडणार!

40 दिवसांत 664 जणांवर कारवाई,उपायुक्त रश्मीता राव यांची संकल्पना

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे


नागपूर,
Mission Night Watch Nagpur, गुन्हेगारांवर नजर ठेवून त्यांच्या हालचालींचा माग घेण्यासाठी पाेलिस उपायुक्त रश्मीता राव यांनी ‘मिशन नाईट वाॅच’ सुरु केले आहे. या उपक्रमाअंतर्गत रात्रीची गस्त, पायी गस्त, सायरन गस्त आणि गुड माॅर्निंग गस्त असे टास्क देण्यात आले आहे. या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम दिसत असून गेल्या 40 दिवसांत 664 संशयित, गुन्हेगारी प्रवृत्तीचे युवक आणि गुन्हेगारांवर कारवाई केली आहे.
 

Mission Night Watch Nagpur, 
पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून गुन्हेगारी नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले आहेत. अनेक उपक्रमात आयुक्तांनी स्वतः सहभागी हाेऊन गुन्हेगारीमुक्त शहरासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून परिमंडळ चारच्या पाेलिस उपायुक्त रश्मीता राव यांनी ‘मिशन नाईट वाॅच’सुरु केले आहे. आता रात्री- अपरात्री शहरात गुन्हे करण्याच्या उद्देशाने िफरणाèया गुंडांविराेधात पाेलिसांनी मिशन नाईट वाॅच हाती घेतले आहे. परिमंडळ चारने राबवलेल्या या उपक्रमात गेल्या 40 दिवसांत 664 जणांवर धडाकेबाज कारवाई केली आहे. त्यामध्ये रात्रपाळी माेहिमेत मैदानात मद्य प्राशन करणाèया 416 जणांची झिंग पाेलिसांनी उतरवत कारवाई केली.
 
 
 
30 ऑगस्ट ते 10 ऑक्टाेबर या 40 दिवसांच्या कालावधीत परिमंडळ चारच्या पाेलिस उपायुक्त रश्मीता राव यांनी ‘मिशन नाईट वाॅच’ अंतर्गत राबवलेल्या ऑपरेशनमध्ये चार टप्पे ठवले आहे. चाेवीस तास पाेलिस रस्त्यावर दिसावे, त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती कमी हाेईल. परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात मंजूर वेळेपेक्षा अधिक वेळ रात्री ढाबा आणि हाॅटेल चालवत ग्राहकांना खाद्य पुरवल्या प्रकरणात पाेलिसांनी 185 जणांवर दंडात्मक कारवाई केली. कसलेही वैध ठाेस कारण नसताना रात्रीच्या वेळी संशयीतरित्या िफरणाèया 31 जणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेत पाेलिसांनी त्यांच्यावरही कारवाई केली. शहरातल्या अनेक भागांमध्ये रात्री- अपरात्री ग्राहकांना मद्य आणि खाद्य पुरवले जात असल्याचे तक्रारी वारंवार येत असतात. त्या अंतर्गत परिमंडळाने कार्याक्षेत्रातील रात्री-अपरात्री सुरू असलेल्या ढाबा चालकांवरही डाेळे वटारले आहेत. परवानगी नसतानाही ग्राहकांना मद्य उपलब्ध करून देत त्यांना रात्री खाद्य पुरवल्या प्रकरणात पाेलिसांनी 32 हाॅटेल आणि ढाबा मालकांवर कारवाई केली.
 
 
असे आहेत उपक्रमाचे टप्पे
 
 
1) रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत आस्थापना चेकिंग आणि कारवाई
2) रात्री 12 ते 2 वाजेपर्यंत घराेडी रेकाॅर्डवरील आराेपी चेकिंग
3) पहाटे 2 ते 4 वाजेपर्यंत सायरन पॅट्राेलिंग व संशयित इसमांची तपासणी
4) पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत गुडमाॅर्निंग पॅट्राेलिंग
 
 
 
परिमंडळाच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास एकही गुन्हा घडू नये म्हणून ‘मिशन नाईट वाॅच’ उपक्रम सुरु केला आहे. सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपक्रमात सहभागी सर्वांनी झाेपेचा त्याग केला असून डाेळ्यात तेल घालून चार टप्प्यात गस्त घालण्यात येत आहे. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत असून भविष्यातही हा उपक्रम सुरु राहणार आहे.
- रश्मिता राव एन. (पाेलिस उपायुक्त, परिमंडळ क्र. 4)