नागपूर,
Chhatrapati Nagar छत्रपती नगर येथील शीतला माता मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या कालावधीत छत्रपती नागरिक मंडळातर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. आनंदी सखी मंडळातर्फे रांगोळी स्पर्धा, पुष्पसजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा, “श्रीयुतम” आणि “आय एम द बेस्ट” हे नाविन्यपूर्ण उपक्रम घेण्यात आले. आकर्षक गरबा नृत्यांच्या सादरीकरणांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. लहान मुलांसाठी आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ डॉ. मंजुषा गिरी यांच्या हस्ते संपन्न झाला.

उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष प्रमोद भोयर, उपाध्यक्ष दिलीप राऊत, सचिव अरुण गोरडे आणि कोषाध्यक्ष अनंत गोळे यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. Chhatrapati Nagar कार्यक्रमाच्या आयोजनात वृषाली अंवरते, रंजना गोतमारे, नेत्रा अंवरते, सोनाली विश्वास, भाग्यश्री, मनीषा बडे, अबोली भंडारकर, भारती पाटील, मंजुश्री घोडे, शिल्पा मेश्राम, भोयर, खासणे तसेच अनिकेत भांडारकर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. संपूर्ण नवरात्र काळात मंदिर परिसरात भक्तिभाव, सांस्कृतिक रंगत आणि आनंदमय वातावरण अनुभवायला मिळाले.
सौजन्य: सुनील गव्हाणे, संपर्क मित्र