नागपूर,
Kojagiri full moon वैदर्भीय लेखिका संस्था ‘अभिव्यक्ती’ तर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘आधुनिक भुलाबाईची गाणी’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत स्वाती सुरंगळीकर यांच्या गीताने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक विनीता हिंगे व रेखा दंडिगे यांनी विभागून मिळवला, तर तृतीय क्रमांक अलका मोकाशी व प्रीती भोयर यांना प्राप्त झाला.
वाचन प्रेरणा दिवसानिमित्त डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या साहित्याचे आणि प्रसिद्ध कादंबरीकार भैरप्पा यांच्या ‘गृहभंग’ या कादंबरीतील अंशाचे अभिवाचन धनश्री पाटील, सई देशपांडे आणि सीमा थत्ते यांनी केले. Kojagiri full moonया कार्यक्रमासाठी अंजली दुरूगकर मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुषमा मुलमुले यांनी केले.
सौजन्य: स्वाती सुरंगळीकर,संपर्क मित्र