पुलगाव,
Pulgaon government hospital येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये बाह्य रुग्ण विभागात नजीकच्या कासारखेड येथील रोहित शंकर वरघणे (२३) हा डोळे दाखवण्यास गेले असता येथे नियमित भेट देणारे डोळे तज्ज्ञ जयस्वाल यांनी त्यांना डोळ्यात टाकण्यासाठी ट्यूब लिहून दिला. बाह्य रुग्ण विभागात उपलब्ध औषधातून हा ट्यूब घेऊन त्याने डोळ्यात टाकला असता त्याला त्रास व्हायला लागला. डोळे लाल झाले.
जळजळ व्हायला लागली. लिहून दिलेल्या औषधाची मुदत बघितली असता तो ऑगस्ट २०२५ मध्येच मुदत संपलेला होता. सायंकाळी त्यांनी आंतर रुग्ण विभागात याबाबत चौकशी केली असता व काही नातेवाईकांनी उपलब्ध ट्यूब मुदत बाह्य आहे तपासण्याचे प्रयत्न केला असता उपस्थित कर्मचार्यांनी शिताफीने सदर स्टॉक तेथून हलवून टाकला असे समजते. अशाप्रकारे मुदत बाह्य औषधी किती लोकांना देण्यात आली हा चिंचेचा विषय आहे.याबाबत, वैद्यकीय अध्यक्ष पी. आर. कोडापे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक व निवासी जिल्हा शल्य चिकित्सक यांना या घटनेबद्दल माहिती दिली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य ते कारवाई करण्यात येईल असे सांगितले.