गडचिरोली,
sai paduka darshan gadchiroli श्री साईबाबा संस्थान, शिर्डी येथून साईबाबांच्या ‘मुळ चर्मपादूका’ गडचिरोलीतील भाविकांकरीत दुसर्यांदा दर्शनाकरीता आज 14 ऑक्टोबर रोजी आगमन होणार आहे. त्या अनुषंगाने आयोजन समितीने जय्यत तयारी केली आहे.
सर्वप्रथम येथील चंद्रपूर मार्गावरील कारगील चौकात श्री साईपादूका रथाचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर कारगील चौकतून आठवडी बाजारातील हनुमान मंदीर ते सराफा लाईन, मुख्य मार्केटमधील साई मंदीर लाईन, त्रिमुर्ती चौक, दुर्गा माता मंदीर, इंदीरा गांधी चौक ते चामोर्शी मार्गावरील साई मंदीरापर्यंत रथ यात्रा काढण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी 11 वाजता चामोर्शी मार्गावरील साई मंदिरात श्री साई पादूका अभिषेक व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 12 वाजता मध्यन आरती व नैवेद्य करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत भजन संध्या, दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत श्री साई पालखी भजन सोहळा, त्यानंतर येथील अभिनव लॉनवर झी मराठी सा रे ग म प महाविजेत्या गायिका कार्तिक गायकवाड आणि ‘कलर्स मराठी गौरव महाराष्ट्राचा’ महाविजेता गायक कौस्तूभ गायकवाड यांचा ‘एक शाम साई के नाम’ हा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमासोबतच रात्रो 10 वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.