सिकंदर’च्या अपयशावरून सलमान खानचा ए. आर. मुरुगदॉसवर हल्लाबोल

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
मुंबई,
Salman Khan  बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने ‘सिकंदर’ चित्रपटाच्या अपयशावर अखेर मौन सोडलं असून, चित्रपटाच्या दिग्दर्शकावर अप्रत्यक्षपणे जोरदार निशाणा साधला आहे. ‘बिग बॉस १९’ या रिअॅलिटी शोच्या वीकेंड विशेष भागात सलमान खानने ‘सिकंदर’च्या शूटिंगदरम्यानच्या घटनांवर भाष्य करताना अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. विशेष म्हणजे, या वेळी त्याने दिग्दर्शक ए. आर. मुरुगदॉस यांच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया दिली आणि त्यांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला.
 

Salman Khan  
‘सिकंदर’ या अलीकडील सलमान खानच्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळालं नाही. त्यानंतर मुरुगदॉस यांनी माध्यमांशी बोलताना दावा केला होता की सलमान शूटिंगदरम्यान वेळेवर सेटवर पोहोचत नव्हते, ज्यामुळे चित्रपटाच्या निर्मितीवर परिणाम झाला. मात्र सलमानने हे आरोप फेटाळून लावत स्पष्ट केलं की त्यावेळी त्याच्या पसलांना इजा झाली होती, तरीही त्याने कामात कसूर केली नाही.
“माझ्या पसल्या तुटल्या होत्या, त्यामुळे मी रात्री ९ वाजता शूटिंगला पोहोचायचो. पण तरीही काम थांबवलं नाही. आणि आमचे डायरेक्टर साहेब म्हणतात, मी उशीर केला,” असं म्हणत सलमानने मुरुगदॉस यांच्यावर नाव न घेता टीका केली. याचबरोबर त्यांनी सांगितलं की, मुरुगदॉस यांची अलीकडील दक्षिणेतील फिल्म Madharaasi मध्ये लीड अ‍ॅक्टर संध्याकाळी ६ वाजता सेटवर यायचा, याकडेही त्यांनी कटाक्षानं लक्ष वेधलं.
 
 
शोमध्ये उपस्थित असलेल्या कॉमेडियन रवि गुप्ता यांनी सलमानला विचारलं की, त्याला कोणत्या चित्रपटांचं काम केल्याचा पश्चात्ताप होतो का? त्यावर सलमानने स्पष्टपणे दोन चित्रपटांची नावं घेतली – ‘सूर्यवंशी’ (1992) आणि निश्चय’ (1992). मात्र अलीकडील कोणत्याही चित्रपटाबाबत त्याने असं काही म्हटलेलं नाही. उलटपक्षी, ‘सिकंदर’बाबत त्याने ठाम भूमिका घेतली की, "लोक म्हणतात ‘सिकंदर’ वाईट होती, पण मला तसं वाटत नाही. प्लॉट उत्तम होता, फक्त अंमलबजावणीत काही गोष्टी गडबडल्या.”सलमानने यावेळी आणखी एक गोष्ट उघड केली की, ‘सिकंदर’चा प्रारंभिक प्रोजेक्ट दिग्दर्शक मुरुगदॉस आणि निर्माता साजिद नाडियाडवाला यांचा एकत्रित प्रयत्न होता. मात्र काही कारणास्तव साजिद प्रोजेक्टमधून बाहेर पडले आणि नंतर मुरुगदॉसही यामधून माघारी गेला. नंतर त्यांनी Madharaasi हा दक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शित केला. याच मुद्द्यावरून सलमानने उपरोधिकपणे टिप्पणी केली की, “ती फिल्म फार मोठी ब्लॉकबस्टर झाली… म्हणजे आमच्या सिकंदरपेक्षाही मोठी!” असा टोमणा मारत तो खुदकन हसला.
 
 
‘सिकंदर’च्या अपयशामुळे सलमान आणि मुरुगदॉस यांच्यातील संबंध आता तणावपूर्ण झाल्याचे संकेत या वक्तव्यांमधून स्पष्टपणे दिसून येतात. सलमानने यावेळी जरी थेट कोणाचं नाव घेतलं नसले तरी संदर्भ इतके ठळक होते की ते कोणावर होते हे समजायला वेळ लागत नाही.‘बिग बॉस’च्या मंचावरून दिलेल्या या ठाम वक्तव्यांद्वारे सलमानने पुन्हा एकदा दाखवून दिलं की, तो केवळ स्टार नाही, तर आपल्या भूमिकेसाठी जबाबदारी घेणारा अभिनेता आहे. आणि गरज पडल्यास, आपल्यावर लावलेल्या आरोपांना उत्तर देण्यासही तो मागे हटत नाही — तेही आपल्या खास, बिनधास्त शैलीत.