तभा वृत्तसेवा उमरखेड,
umarkhed panchayat samiti तालुक्यातील पंचायत समितीच्या 12 गणांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक जिजाऊभवन सभागृहात पार पडली. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे व तहसीलदार राजेश सुरडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही सोडत पार पडली. पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण ठरविण्याची ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व नियमानुसार राबविण्यात आली. या सोडतीनुसार पंचायत समिती सदस्यांचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित झाले आहे.
विडूळ : अनुसूचित जाती (महिला), ब्राम्हणगाव :अनुसूचित जाती, खरबी :अनुसूचित जमाती (महिला), कोरटा वन : अनुसूचित जमाती, सुकळी (ज) :नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), पोफाळी : नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), चातारी :नागरिकांचा मागास प्रवर्ग, मुळावा : सर्वसाधारण (महिला), मार्लेगाव :सर्वसाधारण, कृष्णापूर : सर्वसाधारण, निंगनूर : सर्वसाधारण (महिला) आणि बिटरगाव (बु) : सर्वसाधारण.
या प्रक्रियेला तालुक्यातील विविध गावांमधील सरपंच, ग्रामसेवक, स्थानिक जनप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित राहून साक्ष दिली. सोडत प्रक्रियेद्वारे आता उमरखेड तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त होत आहे.