वाशीम जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण जाहीर

दिवाळीनंतर राजकीय वातावरण तापणार

    दिनांक :13-Oct-2025
Total Views |
वाशीम,
washim zilla parishad ग्रामीण भागाच्या विकासाचे मिनी मंत्रालय समजल्या जाणार्‍या वाशीम जिल्हा परिषदेच्या ५२ गटासाठी आज, १३ ऑटोबर रोजी आरक्षण काढण्यात आले असून परिणाम पुढे आल्यावर अनेकांचे मतदार संघ राखीव झाले तर अनेकांना त्यामुळे संधी उपलब्ध झाल्याने कुठे आनंद तर कुठे निराशा असे वातावरण पहायला मिळाले. यावेळी जिल्हाधिकारी तथा पिठासिन अधिकारी जि.प.निवडणूक योगेश कुंभेजकर अपर जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी अधिकारी जि.प.निवडणूक राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
 

 washim zilla parishad 
वाशीम जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अगोदरच अनुसूचीत जमाती महिलेसाठी राखीव झाले आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातील अनेकांचा अपेक्षाभंग झाला आहे. गटनिहाय जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये वाशीम तालुयातील काटा जिप सर्कल (नामाप्र सर्वसाधारण), पार्डी टकमोर (सर्वसाधारण महिला), वारा जहागीर (सर्वसाधारण), कळंबा महाली (सर्वसाधारण), तामसी (सर्वसाधारण महिला), अडोळी (अनुसूचीत जाती सर्वसाधारण), तोंडगाव (अनुसचीत जाती सर्वसाधारण), अनसिंग (सर्वसाधारण महिला), वारला (सर्वसाधारण महिला), रिसोड तालुयातील केनवड जिप सर्कल (सर्वसाधारण), गोवर्धन (अनुसूचीत जाती महिला), रिठद (अनुसुचीत जाती महिला), कवठा खू. (अनुसूचीत जाती सर्वसाधारण), हराळ (सर्वसाधारण महिला), वाकद (सर्वसाधारण), गोभणी (नामाप्र सर्वसाधारण), भर जहागीर (सर्वसाधारण), चिचांबाभर (सर्वसाधारण महिला), मालेगाव तालुयातील शिरपूर जिप सर्कल (सर्वसाधारण), वितळी (नामाप्र महिला), डोंगरकिन्ही (अनुसूचीत जाती महिला), मेडशी (अनुसूचीत जमाती महिला), ब्राम्हणवाडा (अनुसूचीत जाती महिला), पांगरी नवघरे (सर्वसाधारण), जऊळका (नामाप्र सर्वसाधारण), किन्हीराजा (अनुसूचीत जमाती महिला), राजुरा (अनुसूचीत जमाती सर्वसाधारण), मंगरुळनाथ तालुयातील आसेगाव (नामाप्र महिला), कासोळा (नामाप्र महिला), कंझरा (अनुसूचीत जाती सर्वसाधारण), शेलू खुर्द (सर्वसाधारण महिला), तर्‍हाळा (नामाप्र सर्वसाधारण), दाभा (सर्वसाधारण), कवठळ (नामाप्र महिला), पारवा (अनुसूचीत जाती महिला), कारंजा तालुयातील धनज बु. जि. प. सर्कल (नामाप्र महिला), भामदेवी (अनुसूचीत जाती महिला), मनभा (नामाप्र सर्वसाधारण), उंबर्डा बाजार (सर्वसाधारण), कामरगांव (सर्वसाधारण), काजळेश्वर (नामाप्र सर्वसाधारण), पोहा (नामाप्र सर्वसाधारण), धामणी (सर्वसाधारण), मानोरा तालुयातील इंझोरी जि. प. सर्कल (सर्वसाधारण महिला), कुपटा (नामाप्र महिला), तळप बु (सर्वसाधारण), आसोला खु. (सर्वसाधारण महिला), गिरोली (नामाप्र सर्वसाधारण), शेंदुरजना (अनुसूचीत जाती सर्वसाधारण), फुलउमरी (सर्वसाधारण), पोहरादेवी जि. प. सर्कल (सर्वसाधारण महिला) प्रवर्गासाठी राखीव निघाले आहे.
वाशीम जिल्हा परिषदेच्या ५२ गटासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यामध्ये अनेक खुल्या प्रवर्गातील दिग्गज उमेदवारांचे गट अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांची मोठी अडचण झाल्याने त्यांना आपल्या हक्काचे गट सोडून दुसर्‍या गटातून निवडणुक लढविण्याची वेळ आली आहे.