तभा वृत्तसेवा यवतमाळ,
yavatmal, zilla parishad जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे आरक्षण सोमवार, 13 ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. या आरक्षण सोडतीने जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. तर नवख्यांना संधी मिळाली आहे.
यवतमाळ तालुक्यातील भारी येथे अनुसूचित जमाती महिला, आकपुरी येथे सर्वसाधारण महिला, अकोलाबाजार येथे अनुसूचित जमाती महिला, रुई येथे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला असे आरक्षण चिमुकल्याच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ही आरक्षण सोडत काढण्यात आली असून, पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विकास मीना उपस्थित होते. आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील दिग्गज नेत्यांचा हिरमोड झाला असून, महिलांना अधिक संधी देण्यात आली आहे. त्यामुळे नव्यख्या उमेदवारांना यंदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.