नागपूर,
abvp-criticizes-nagpur-university राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यात अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप अभाविपच्या विदर्भ प्रांत मंत्री पायल किनाके यांनी १४ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत केला. गेल्या काही वर्षांत प्रवेश प्रक्रिया, परीक्षा व्यवस्थापन, निकाल जाहीर करण्यात होणारा विलंब, पाठ्यक्रमातील अनियमितता आणि पदभरतीतील ढिलाई यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य धोक्यात आल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

प्रवेश, परीक्षा आणि परिणाम योग्य वेळेत व सुसूत्र पद्धतीने घेणे ही विद्यापीठाची मूलभूत जबाबदारी आहे, मात्र नागपूर विद्यापीठ या तिन्ही आघाड्यांवर अपयशी ठरत आहे. अभाविपने वारंवार निवेदने व आंदोलने करूनही विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचे ठोस निर्णय घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला. हॉलतिकीट वितरणातील त्रुटी, परीक्षा केंद्रांवरील अडचणी आणि वेळेत न लागणारे निकाल यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक व शैक्षणिक नुकसान होत असल्याचेही किनाके यांनी नमूद केले. अभाविपने विद्यापीठाविरोधात मोठ्या स्तरावर आंदोलन जाहीर केले असून त्याचे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. abvp-criticizes-nagpur-university दिनांक १ ते १० ऑक्टोबर समस्या शोध अभियान, दिनांक १३ ऑक्टोबर छात्रनेता संमेलन, दिनांक ०६ नोव्हेंबर महाविद्यालय बंद आंदोलन आणि दिनांक १३ नोव्हेंबर विद्यापीठ मोर्चा. या मोर्चात प्रवेश, परीक्षा, निकाल, पाठ्यक्रम, शिष्यवृत्ती, वसतिगृह, एनईपी क्रियान्वयन आणि छात्रसंघ निवडणुका या प्रमुख मागण्या असतील. यावेळी 'छात्रशक्ती एकत्र आली तर प्रशासन हलवू शकते. शिक्षण हे फक्त भविष्याची तयारी नाही, तर तेच खरे जीवन आहे,” असे सांगत अभाविपने हा मोर्चा प्रशासनाला जागे करण्याचा इशारा दिला आहे.