टेक्सास,
space starship जगातील सर्वात शक्तिशाली आणि अत्याधुनिक रॉकेट मानल्या जाणाऱ्या स्पेसएक्सच्या ‘स्टारशिप आवृत्ती २’ च्या ११व्या चाचणी प्रक्षेपणाने इतिहास रचला आहे. एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील या प्रकल्पाने पुन्हा एकदा सिद्ध केलं की मानवी कल्पकतेची आणि विज्ञानाच्या प्रयोगशीलतेची मर्यादा नाही.
मंगळवारी सकाळी ५ वाजता टेक्सासमधील बोका चिका या प्रक्षेपण स्थळावरून हे रॉकेट अवकाशात झेपावले. एक तास सहा मिनिटांच्या या मोहिमेदरम्यान स्टारशिपने यशस्वीरीत्या उपग्रह अवकाशात सोडला आणि त्यानंतर नियोजनाप्रमाणे हिंदी महासागरात सुरक्षितरीत्या उतरले. या प्रक्षेपणाचा मुख्य उद्देश म्हणजे रॉकेटच्या ‘सुपर हेवी बूस्टर’ आणि ‘स्टारशिप स्पेसक्राफ्ट’ या दोन्ही भागांच्या पुनर्वापरक्षम क्षमतेची चाचणी घेणे हा होता. हा प्रयत्न पूर्णपणे यशस्वी झाल्याने मस्क यांच्या ‘मंगळ मोहिमे’च्या दिशेने एक मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. स्पेसएक्सने यापूर्वी घेतलेल्या १०व्या चाचणीप्रमाणे ही मोहिमाही यशस्वी ठरली. या रॉकेटची उंची तब्बल ४०३ फूट, म्हणजेच सुमारे ४० मजली इमारतीइतकी आहे. हे जगातील सर्वात उंच आणि शक्तिशाली रॉकेट मानले जाते.
प्रक्षेपणानंतर थोड्याच वेळात सोशल मीडियावरून एलन मस्क यांनी ट्विट करत सांगितले की, “स्टारशिपची ११वी उड्डाण चाचणी अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरली. ही फक्त सुरुवात आहे; पुढचा टप्पा म्हणजे मंगळावर मानव पाठवण्याचा.” तथापि, या मोहिमेदरम्यान काही किरकोळ तांत्रिक अडचणी आल्या.space starship अवकाशात प्रवेश करताना रॉकेटच्या बाहेरील आवरणावर तापमान नियंत्रण प्रणालीमध्ये काही तांत्रिक झटके बसले, ज्यामुळे काही सेंसर निष्क्रिय झाले. मात्र, संपूर्ण प्रणालीने संतुलन राखत रॉकेट सुरक्षितरीत्या महासागरात उतरवले.
या यशामुळे एलोन मस्क यांच्या मंगळ मोहिमेला गती मिळेल, तसेच भविष्यातील व्यावसायिक अवकाश प्रवासाचे दरवाजे अधिक मोठ्या प्रमाणावर खुलतील, असा तज्ञांचा अंदाज आहे. “स्टारशिप हा केवळ एक रॉकेट नाही, तर मानवजातीच्या अवकाशातील भविष्याची गुरुकिल्ली आहे,” -असे एलन मस्क यांनी प्रक्षेपणानंतर सांगितले.