बुलढाणा,
bjp-district-president-shinde राज्यात नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धाड आणि धामणगाव बढे या दोन नव्या तालुयांची निर्मिती करण्याची आग्रही मागणी केली आहे. १३ ऑटोबर रोजी भाजपा विभागीय बैठकीदरम्यान ही मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे सादर केली.
या निवेदनाची दखल घेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी राज्याचे महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना प्रस्ताव अंतर्भूत करण्याचे’ लेखी आदेश दिले आहेत, असा दावाही शिंदे यांनी केला आहे. राज्य सरकारने लवकरच २० नवीन जिल्हे आणि ८१ तालुके निर्माण करण्याचा निर्णय होण्याचे संकेत महसूल मंत्री बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते. त्याच अनुषंगाने धाड आणि धामणगाव बढे या गावांचा प्रस्ताव महत्त्वाचा ठरणार आहे. नमूद निवेदनात करण्यात आले आहे की, धाड आणि धामणगाव बढे या गावांची लोकसंख्या प्रत्येकी सुमारे २५ हजार असून परिसरातील ६० ते ७० गावे या दोन्ही केंद्रांशी नैसर्गिकरीत्या जोडलेली आहेत. एकत्रित लोकसंख्या १ लाखांहून अधिक आहे. bjp-district-president-shinde सध्याच्या तालुका ठिकाणांपासून ही गावे दूर असल्याने नागरिकांना प्रशासकीय, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक सेवांसाठी मोठा प्रवास करावा लागतो. तालुका दर्जा मिळाल्यास स्थानिक प्रशासन जलद, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होईल, असा युक्तिवाद या निवेदनात करण्यात आला आहे. दोन्ही गावांमध्ये महाविद्यालय, उच्च माध्यमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलिस ठाणे, कृषी सेवा केंद्र, बँका आणि सहकारी संस्था यांसारख्या मूलभूत सुविधा आधीच उपलब्ध आहेत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणांची प्रशासकीय क्षमता सक्षम असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. महसूल मंत्री बावनकुळे यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक संकेत दिले असल्याचा दावा विजयराज शिंदे यांनी केला आहे.