खरांगणा,
wild-boar-infestation : यावर्षी सततचा पाऊस, अतिवृष्टीने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून काही शेतकर्यांची पिके बर्यापैकी स्थितीत असताना वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पिकांचे नुकसान होत आहे. आर्वी तालुयातील काचनूर शिवारात रानडुकरांच्या उपद्रवाने तब्बल दीड ते दोन एकरातील कपाशी जमीनदोस्त झाली. कपाशीची नासाडी पाहून शेतकर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शेतातील दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
काचनूर येथील सौरभ पुणेवार यांनी तीन एकरात कपाशीची लागवड केली. कपाशीचे योग्य व्यवस्थापन करत मोठा खर्च केला. कपाशीच्या एका झाडाला ४० ते ५० बोंडे होती. त्यांना एकरी २५ ते ३० विंटलपर्यंत उत्पादन होण्याची अपेक्षा होती. मात्र, ११ ऑटोबरच्या रात्री रानडुकरांनी शेतात धुमाकूळ घातला. रानडुकरांच्या उपद्रवात दीड ते दोन एकर शेतातील कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकरी सकाळी शेतात गेल्यानंतर त्यांना धकाच बसला. सौरभ पुणेवार यांनी कपाशीवर जवळपास एकरी ४५ हजार रुपये खर्च केला. पण, रानडुकरांमुळे कपाशीचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. सौरभ यांच्या शेतीला सौर कूंपन लावलेले आहे. मात्र, त्यानंतरही रानडुकरांनी शेतात धुडगूस घालून पिकांचे नुकसान केले. नुकसानीची भरपाई देण्यात यावी. वनविभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा. शेतीला जाळीचे कुंपन द्यावे, अशी मागणी सौरभ पुणेवार यांनी केली आहे.
आर्वी तालुयातील उमरी येथेही रानडुकरांच्या उपद्रवात कपाशीचे नुकसान झाले. उमरी येथे मोरेश्वर सिरसाम यांच्या शेतातील कपाशीचेही रानडुकरांनी नुकसान केले. रानडुकरांचा बंदोबस्त करून पीक संरक्षणार्थ वनविभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मोरेश्वर सिरसाम यांनी केली.