४ एकर सोयाबीनमध्ये सोडल्या गाई

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |

Cows abandoned in soybeans
 
 
खरांगणा, 
Cows abandoned in soybeans सोयाबीनवर येलो मोझॅक चारकोल रॉट रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने खरांगणा येथील शेतकरी मनोज सतीजा यांनी आपल्या चार एकर शेतातील पिकामध्ये जनावर सोडले. सोयाबीन सोेंगण्याचा व काढण्याचा खर्च सुद्धा निघणार नसल्याने शेतकर्‍याने उभ्या सोयाबीनमध्ये जनावर सोडण्याची निर्णय घेतला. मनोज सतीजा यांना मागील वर्षी ४ एकरात ३२ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न झाले होते. खर्च जाता समाधानकारक पैसे सोयाबीन मधून वाचल्यामुळे त्यांनी यावर्षी सोयाबीन पेरण्याचा निर्णय घेतला. शेंगा भरण्याच्या वेळीच चारकोल डॉट हा रोग सोयाबीनवर आल्याने त्यांनी चार एकर सोयाबीनमध्ये जनावर सोडण्याचा निर्णय घेतला.