मानोरा,
Deepak Balme : संघाची स्थापनाच राष्ट्रहित कार्यासाठी झाली असून, देशातील प्रत्येक आपत्ती मध्ये संधाच्या स्वंयसेवकांनी सहाभागी होऊन अपादग्रस्ताची नेहमीच मदत करुण संकटावर मात करण्यासाठी आपला सहभाग नोंदविलेला आहे तसेच आज देशात धर्मांतरणाचे अनेक मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत असून, हिंदुंनी जागरुक रहावे व धर्माचे रक्षण करण्यासाठी राष्ट्रहीत कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन अकोला जिल्हा संघ प्रचारक दीपक बळमे यांनी ३ ऑटोबर रोजी माहेश्वरी भवन येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यानिमित्त व्यासपीठावरून बोलताना केले.

विजयादशमी सोहळ्याच्या व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पंकज राऊत, मुख्य वक्ते दीपक बळमे, मानोरा खंड कार्यवाह आकाश शेळके हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहरातून बँड वाद्याच्या तालावर पंथसंचन करण्यात आले होते, यानंतर प्रमुख अतीथी पंकज राऊत यांच्या हस्ते शस्त्र पुजन व ध्वज पुजन करुन ध्वजवंदना देऊन संघप्रार्थना घेण्यात आली. पुढे बोलताना दीपक बळमे म्हणाले की, संघशक्ती कलियुगे संघाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, वसुधैव कुटुंबकम या भावनेने संघाचे आचरण असून, मनुष्य निर्माण करण्याचे कार्य अहोरात्र घडत आहे. संघ शाखेमध्ये येणारे आज मोठ्या सन्मानात विविध पदे भूषवित आहे. शिस्तीत जगण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर संघ शाखेमध्ये सहभाग नोंदविणे गरजेचे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५ मध्ये नागपूर येथे झाली होती. आज २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे पूर्ण झाली असून, वर्षभरात संघ विविध उत्सव साजरे करतो.
यावेळी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्या जीवन प्रवासा विषयी म्हणाले की एमबीबीएसची पदवी घेऊन सुद्धा आपला दवाखाना न थाटता हिंदुची मानसिकता ओळखून व हिंदूमध्ये आलेली धर्माविषयीची मरगळ दूर करण्यासाठी संघाची स्थापना केली. संघाने मागील शतकी वर्षा मधील केलेल्या कार्याचा उहापोह केला नाही अनेक टीकाकारांनी संघावर नेहमीच टीका केली आहे. परंतु वसुधैव कुटुंबकम भावना संघाच्या हृदयात असल्याने संघाच्या कोणत्याही कार्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला नाही.
देशावर आलेल्या प्रत्येक आपत्तीमध्ये संघाचे स्वयंसेवक पहिले सेवा देण्यासाठी तेथे पोहोचतात. संघांत व्यक्ती पुजा ऐवजी ध्वज पुजनाला महत्व दिल्या जाते. संघाद्वारे देशात लाखो सेवा प्रकल्प आज सुरू असून, त्याचा लाभ अनेकांना मिळत आहे. कोरोना काळात रुग्णांना मदत करत असताना स्वयंसेवकांनी आपले प्राणही गमावले. हिंदू धर्मातील अनेकांच्या मनात धर्माविषयी द्वेष फलविण्याचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे, यापासून हिंदूंनी सावध राहावे. आज भारत मातेची वाटचाल विश्वगुरु होण्याकडे असून, या करीता हिंदुनी जातीभेद विसरुन तळागाळातील लोकांच्या उत्थानासाठी सामुहीक प्रयत्न गरजे आहे तरच देश विश्वगुरु झाल्या शिवाय राहणार नाही, असेही बळमे शेवटी म्हणाले.
यावेळी संघप्रार्थने नंतर स्वयंसेवकांनी विविध शारीरिक आसनांचे प्रात्यक्षिक सादर केले. संगीत बौद्धिक कार्यक्रम आणि अमृतवाचन व चरेवती चरेवती हा मंत्र भावेश देशमुख, कृष्णा ठाकरे यांनी प्रस्तुत केले. आकाश शेळके यांनी प्रास्ताविक भाषण करत मुख्य अतिथी व प्रमुख वक्ते यांचा परिचय करून दिला. यावेळी अरविंद इंगोले, करण ठाकूर, गोपाल हेडा, राम हेडा, मयूर देशमुख, भावेश खाडे, जगदीश जोशी, शुभम छालीवार, रवी पकमोडे, यश मांडवगडे, विवेक रत्नपारखी यांच्यासह विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकार्यांसह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.