कपडे फाडले, नको तिथे स्पर्श करत...

दिल्लीच्या साऊथ एशियन विद्यापीठात बलात्काराचा प्रयत्न

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
Delhi South Asian University देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा संतापजनक घटनेने हादरली आहे. दक्षिण दिल्लीतील साऊथ एशियन युनिव्हर्सिटी मध्ये एका विद्यार्थिनीवर चार जणांनी मिळून सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनेनंतर विद्यापीठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
 

Delhi South Asian University 
 
पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार, पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, चार पुरुषांनी माझ्यावर जबरदस्ती केली. त्यांनी माझे कपडे फाडले, नको तिथे स्पर्श केला आणि नंतर सामूहिक बलात्काराचा प्रयत्न केला. हा प्रकार विद्यापीठाच्या बांधकाम सुरू असलेल्या भागात घडला असल्याची माहिती तिने पोलिसांना दिली. या भीषण घटनेनंतर पीडित विद्यार्थिनीने घाबरत-घाबरत पीसीआर कॉल करून घटनेची माहिती पोलिसांना दिली.
 
 
घटना सोमवारी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडल्याचे समजते. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत विद्यार्थिनीचा जबाब नोंदवला आणि तिच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सर्व बाजूंनी तपास केला त आहे आणि लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. दरम्यान, विद्यार्थिनीचे समुपदेशन करण्यात येत आहे. पोलिस सूत्रांनी सांगितले की, साऊथ एशियन युनिव्हर्सिटी परिसरात जवळजवळ सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत. त्यामुळे आरोपींची ओळख पटवण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. तपास यंत्रणांना या माध्यमातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.