नागपूर,
increased-fares-for-bus-train-plane दिवाळीच्या सुट्टीत आपआपल्या गावी जाण्यासाठी प्रवाशांची संख्या वाढल्याने विमान कंपण्यांनी तिकीट दर वाढविले आहे. याशिवाय लांब पल्ल्याच्या मार्गावरील खाजगी ट्रॅव्हलचे दर वाढल्याने प्रवाशांना फटका बसला आहे. निमित्त्याने आपल्या गावी जाण्यासाठी अनेकांनी रेल्वेचे आरक्षण काढल्यामुळे त्यांचा प्रवास आरामदायक होईल, अशी अपेक्षा होती. मात्र वेळेवर तिकीट काढून प्रवास करणार्या प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्याने रेल्वेतील अवस्था गंभीर झाली आहे.
देशांतर्गत विमान सेवा महागली
मुख्यत: दिवाळीच्या दहा दिवसातील सर्व विमान कंपण्यांची तिकीट उपलब्ध नसल्याने काही विमान कंपन्यांनी प्रवाशांचे दिवाळे आहे. increased-fares-for-bus-train-plane पुणे, मुंबई,दिल्ली या देशांतर्गत विमान सेवा पुढील दहा दिवसांसाठी महागली आहे. येत्या शनिवारपासूनच दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने मुंबई, पुणे, दिल्ली,लखनऊ, पाटणा आदी प्रमुख शहराचे विमान भाडे वाढले आहे. विदेशातील तिकीटांच्या बरोबरीचे प्रवास भाडे देशांतर्गत विमान सेवेचे झाले आहे.
प्रवाशांना आर्थिक फटका
एकीकडे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाजगी ट्रॅव्हल आणि भाडे वाढल्याने आर्थिक फटका तर दुसरीकडे आरक्षण तिकीट उपलब्ध असताना रेल्वेतील प्रवास गर्दीतून करावा लागत आहे. दसरा झाल्यानंतर दिवाळीच्या दहा ते पंधरा दिवसपर्यंत रेल्वेतील सर्व मार्गावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसून येते. increased-fares-for-bus-train-plane मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर चारही दिशेने रेल्वे येतात आणि जातात त्यामुळे स्थानक परिसरात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. रेल्वे २ नोव्हेंबरपर्यंतच्या कन्फर्म तिकीट मिळणे कठीण झाले आहे.
दंड भरुन प्रवाशांचा प्रवास
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून रेल्वेकडून सर्वच मार्गावर अतिरिक्त रेल्वे गाड्या सुरु केल्या आहेत. विशेषतः नागपूर-मुंबई, नागपूर-पुणे, नागपूर-दिल्ली, नागपूर-हैदराबाद, नागपूर-जबलपूर आणि नागपूर-हावडा या मार्गांवर धावणार्या अनेक रेल्वे गाड्यांमध्ये सर्वाधिक प्रवासी संख्या दिसून येत आहे. increased-fares-for-bus-train-plane या मार्गावरील तिकीट आरक्षण नसल्याने प्रवाशांना दंड भरुन प्रवास करावा लागत आहे.
सर्वाधिक गर्दीत जीवघेणा प्रवास
मध्यवर्ती नागपूर रेल्वेस्थानकावर दिवाळीच्या सुटीतील गर्दीचा अनुभव प्रवाशांना मिळत आहे. नागपूरकडे येणार्या गीतांजली, सेवाग्राम, विदर्भ, दुरंतो, हावडा मेल या गाड्यांमध्ये सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. तरी सुध्दा अनेकांचा जीवघेणा प्रवास सुरु आहे. तिकीट मिळणे कठीण झाले असताना पुण्याहून येणार्या रेल्वेगाड्या हाउसफूल धावत आहे. पुणे- नागपूर सुपरफास्ट, गरीब एक्सप्रेस, बिलासपूर एक्सप्रेस आणि महाराष्ट्र एक्सप्रेसमध्येही कन्फर्म तिकिटासाठी प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागत आहे.