झाशी,
Jhansi husband video संशय कधी कधी माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, असं म्हणतात, आणि त्याचं जिवंत उदाहरण उत्तर प्रदेशातील झाशी येथे दिसून आलं आहे. पत्नीवर संशय घेऊन एका पतीने रागाच्या भरात एवढी अंधाधुंद कृती केली की आता संपूर्ण गावात त्याचीच चर्चा सुरू आहे. एका निर्दोष तरुणाला त्याने पत्नीचा प्रियकर समजून बेदम मारहाण केली, पण काही वेळातच या घटनेचा खरा ट्विस्ट समोर आले. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, या व्हिडिओत काही लोक एका तरुणाला निर्दयपणे मारहाण करत असल्याचे स्पष्टपणे दिसते. ही घटना झाशीतील मौरानीपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश आर्य या व्यक्तीला आपल्या कुटुंबाकडून माहिती मिळाली की त्याची पत्नी दुसऱ्या तरुणासोबत हॉटेलमध्ये आहे. ही माहिती मिळताच तो संतापाने पेटून उठला आणि ताबडतोब हॉटेल गाठले. तिथे त्याला पत्नी एका तरुणासोबत दिसली आणि क्षणाचाही विलंब न लावता त्याने त्या तरुणावर हल्ला केला. कोणतीही चौकशी न करता किंवा परिस्थिती समजून न घेता त्याने त्या तरुणाला पत्नीचा प्रियकर समजून त्याची धुलाई केली.
पण नंतर समोर आलेल्या सत्याने सर्वांनाच थक्क केले. हॉटेलमध्ये मारहाण झालेला तरुण सोनू उर्फ प्रमोद आर्य हा त्या महिलेला मदत करणारा व्यक्ती होता. सोनूने पोलिसांना दिलेल्या निवेदनात सांगितले की, तो काही कामासाठी हॉटेलमध्ये गेला होता. तेव्हा त्या महिलेने त्याच्याकडे हॉटेलमधून बाहेर पडण्यासाठी मदत मागितली. तो तिला मदत करत असतानाच महिलेचा नवरा आणि तिचं सासरचं मंडळ तिथे पोहोचले. पतीने गैरसमज करून घेतला आणि त्याच्यावर निर्दय हल्ला चढवला.
मारहाणीच्या दरम्यान सोनूला वाचवण्यासाठी त्याचे वडील आणि भाऊ तिथे आले, मात्र संतापलेल्या पतीने त्यांनाही सोडलं नाही. त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांना मौरानीपूर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, या घटनेबाबत महिलेने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सांगितले की,“ पुरुषासोबत तिचं नाव जोडण्यात आलं आहे, त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही. मी दुसऱ्या व्यक्तीला भेटायला आले होते. सोनू फक्त तिथून मला बाहेर पडण्यास मदत करत होता.