वर्धा,
Kawatha Railway Station मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आधुनिकीकरण आणि सुरक्षेच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. नागपूर विभागातील सिग्नल आणि दूरसंचार विभागाने यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पांतर्गत कवठा रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक इलेट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
नवीन बसविलेली ईआय प्रणाली एसआयईएमईएनएस कंपनीने निर्मित केली असून ती ३४ मार्गांवर नियंत्रण ठेवते आणि जुन्या यांत्रिक सिग्नलिंग प्रणालीची जागा घेते. ही अत्याधुनिक डिजिटल प्रणाली रेल्वे गाड्यांच्या हालचाली अधिक कार्यक्षम, सुरक्षित आणि अचूक बनवते. कवठा स्थानकावरील रेल्वे वाहतूक आता अधिक वेगवान, सुरक्षित झाली आहे. इलेट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली स्वयंचलित मार्ग-निर्धारण, वेळेचे नियोजन आणि सिग्नल व पॉईंट्स यांच्यात समन्वय निश्चित करते. त्यामुळे मानवी चुका होण्याची शयता कमी होते आणि परिचालन कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होते.