बुलढाणा,
maa-jijau-urban-awarded माँ जिजाऊ अर्बनला सहकार क्षेत्रातला मानाचा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तिसर्यांदा मिळालेल्या दीपस्तंभ पुरस्कारामुळे माँ जिजाऊ अर्बनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. ३५० कोटीचा व्यवसाय माँ जिजाऊ अर्बन ने पार केला आहे. याबद्दल महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या वतीने २०२४-२०२५ साठीचा दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

दि.१२ व १३ ऑटोबर रोजी महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यस्तरीय प्रशिक्षण व दीपस्तंभ पुरस्काराचे आयोजन, डेनिसन्स रिसॉर्ट, गोकर्ण महाबळेवर, कुमठा कर्नाटक येथे आयोजित करण्यात आला होता. maa-jijau-urban-awarded याप्रसंगी या पुरस्काराचे वितरण राज्य संस्था फेडरेश पत्तसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, खासदार प्रभाकर कोरे अध्यक्ष कर्नाटक लिंगायत एज्यूकेशन सोसायटी, अण्णासाहेब जोले खासदार चिक्कोडी, माजी आमदार राहुल बोंद्रे , संजय होसमठ संचालक कर्नाटक राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे यांच्या हस्ते माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे, सचिव नितीन जाधव, कार्यकारी संचालक रामेश्वर साखरे, सरव्यवस्थापक मनोज तायडे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यभरातून पतसंस्थांचे संचालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तिसर्यांदा राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार मिळाल्याबद्दल माँ जिजाऊ अर्बनचे संचालक व कर्मचारी यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.