प्रियकराची आत्महत्याप्रकरणी प्रेयसीविराेधात गुन्हा

- विवाहित असतानाही लग्न करण्याचा लावला तगादा

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
boyfriends-suicide-case : पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बीएस्सी अ‍ॅग्रीचे शिक्षण घेत असलेल्या ईश्वरलाल चाैधरी (21) याने वसतिगृहात आत्महत्या केली. पाेलिसांनी सुसाईड नाेट आणि माेबाईलमधील चॅटिंगच्या आधारे त्याच्या प्रेयसीविराेधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मृत विद्यार्थी राजस्थानमधील बाडमेर येथील आहे. तर प्रेयसी साेनम (बदललेले नाव) ही काटाेल येथील रहिवासी आहे.
 
 
 
LOVE AFFAIRE
 
 
 
 
सूत्रांच्या माहितीनुसार, ईश्वर चाैधरी याचे शिक्षण सुरु असतानाच लग्न झाले. ताे विवाहानंतर नागपुरात शिक्षणासाठी आला हाेता. यादरम्यान त्याचे महाविद्यालयीत शिक्षण घेत असलेल्या साेनमसाेबत ओळख झाली. दाेघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून दाेघांमध्ये दुरावा निर्माण झाला हाेता. परिणामी ताे तणावाखाली हाेता. साेनम त्याला ब्लॅकमेल करीत हाेती. 1 ऑक्टाेबर राेजी ईश्वर त्याच्या खाेलीतून बाहेर न आल्याने वर्गमित्रांनी वसतिगृहाच्या खिडकीतून आत डाेकावून बघितले असता ताे लटकलेल्या स्थितीत आढळून आला. तत्काळ पाेलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. प्रारंभी पाेलिसांनीही अपघाती मृत्यूची नाेंद करून तपास प्रारंभ केला.
 
सुसाईड नाेटवरुन गुन्हा दाखल
 
 
ईश्वरच्या खाेलीत पाेलिसांना दाेन पानांची सुसाईड नाेट आढळली. यात त्याने सहा महिन्यांपासून तणावात असल्याचे नमूद करत आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्यांचा विश्वासघात करीत असल्याचे लिहिले आहे. पुढे त्याने, सातत्याने ब्लॅकमेल केले जात असल्याचे लिहिले हाेते. पाेलिसांनी सुसाईड नाेट जप्त केली. शिवाय माेबाईल तपासला असता त्यात साेनम आणि ईश्वर यांचा संवाद सापडला. महत्त्वाचे म्हणजे ईश्वरच्या वर्गमित्रांनी त्याच्या नातेवाईकांना याबाबत कळवले हाेते. या सर्व पुराव्यांच्या माध्यमातून पाेलिसांनी साेनमविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
 
 
मुली कायद्याचा गैरवापर करतात!, सुसाईड नोटमध्ये उल्लेख
 
 
त्याने मित्रांना सांगितले होते की, गुंजन सतत क्षुल्लक कारणांवरून वाद घालते आणि लग्नासाठी दबाव टाकते. शिवाय वेळोवेळी पैसेही उकळते. महत्त्वाचे म्हणजे त्यानेही गुंजन छळत असल्याचे काही नातेवाईकांना सांगितले होते. नातेवाईकांनी ईश्वरच्या पत्नी आणि कुटुंबाशी चर्चा करून ईश्वरच्या पत्नीला नागपूरला रवाना केले होते. परंतु ती पोहचण्यापूर्वीच ईश्वरने अखेरचा मार्ग स्वीकारला. ईश्वरने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिले की त्याने गुंजनशी आत्महत्येबद्दल चर्चा केली होती. परंतु तिने त्याचा काही फरक पडणार नाही, देशाचा कायदा तिला पाठिंबा देईल असे म्हटले आहे. काही मुली कायद्याचा गैरवापर करतात असे नमुद करत त्याने असे कायदे सुधारविण्याची विनंती त्याने पंतप्रधानांना केली आहे.