देवळी,
ratnapur-development-work : रत्नापूर येथे विविध विकास योजनेतून १११ लाख ५४ हजार किमतीच्या विविध विकास कामांचे भुमिपूजन व लोकार्पण आ. राजेश बकाने व माजी खासदार रामदास तडस यांच्या हस्ते, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते यांच्या अध्यक्षेतखाली करण्यात आले. यावेळी राहुल चोपडा, स्वप्नील खडसे, मयुरी मसराम, रत्नापुर येथील सरपंच सुधीर बोबडे, उपसरपंच सौरभ कडू, किशोर मुडे, प्रशांत सावंकार, आदी उपस्थित होते.
यावेळी आ. बकाने म्हणाले की, देवळी विधानसभा क्षेत्र अनेक वर्षापासून विकासापासून वंचित होता. परंतु, आता विकास करण्यासाठी राज्यसरकारच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात निधी आणण्याची जबाबदारी आपली आहे. आपल्या क्षेत्रातील प्रत्येक गावामध्ये विकास करण्यासाठी आपण आमदार म्हणून कटीबद्ध असल्याचे आ. बकाने म्हणाले.
तर माजी खासदार तडस यांनी ग्रामपंचायत हा ग्रामीण प्रशासकीय यंत्रणेचा सर्वात महत्त्वाचा घटक असून ते विकासाचे केंद्रच आहे. देशाचा विकास करावयाचा असेल तर ग्रामीण भागातील प्रत्येक कुंटुंब आत्मनिर्भर व विकसीत होणे आवश्यक आहे. गावाच्या विकासासाठी इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. रत्नापूर येथे सत्ता परिवर्तन झाल्यामुळे हे गाव विकासाकडे वाटचाल करीत आहे. हा विकास गावाच्या विकासासाठी महत्त्वपुर्ण असल्याचे प्रतिपादन तडस म्हणाले. पुर्वीचे सरकार हे फत कागदावरच विकास दिसत होता. परंतु, भाजपा महायुतीचे सरकार हे विकासात्मक असुन शहर असो किंवा गाव प्रत्येक क्षेत्राचा सर्वांगिण विकासासाठी कार्य करीत असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय गाते म्हणाले. संचालन ग्रामविकास अधिकारी अंकीता इसळ यांनी केले तर आभार सरपंच सुधीर बोबडे यांनी मानलेे.