ई-केवायसीसाठी सर्व्हर डाऊन ठरतेय डोकेदुखी

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
Server down for e-KYC
 
 
वर्धा, 
Server down for e-KYC लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी अनिवार्य केले आहे. त्यामुळे सध्या ई-केवायसी करण्यासाठी लाभार्थी महिला जीवाचा आटापीटा करीत आहे. मात्र, डाऊन सर्व्हरचा नाहक त्रास लाडया बहिणींना सोसावा लागत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील ३ लाख २० हजार ४९१ महिलांनी अर्ज केला. २० हजार ७७८ अर्ज बाद केले. त्यामुळे जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार ७१३ महिलांना या योजनेचा लाभ दिला जात आहे. पण ई-केवायसी करण्यासाठी असलेल्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी तांत्रिक अडचणी येत असल्याने ई-केवायसी करताना लाडया बहिणींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. संकेतस्थळावर उद्भवत असलेल्या विविध तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्या, अशी मागणी लाडया बहिणींनी केली आहे. १८ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या लाभार्थ्यांना १८ नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.