पुलगाव,
gajanan vaichal समाज व संघ एकरूप झाला पाहिजे. म्हणून पंचपरिवर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये उत्क्रांती करायचा संकल्प करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी साजरी करत आहे. जागतिक अस्वस्थतेमध्ये मार्ग दाखवू शकेल, अशी विचारधारा पंच परिवर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये निर्माण करण्याचा संघाचा संकल्प आहे. व्यती निर्माणाच्या या कार्यामध्ये समाजाने सहकार्य करावे, असे आवाहन हिंदुत्व अध्ययन केंद्राचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक व भारतीय विचार मंचाचे प्रचारक गजानन वायचाळ यांनी केले. स्थानि आर. के. हायस्कूलच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुलगाव नगर विजयादशमी उत्सवात प्रमुख वते म्हणून गजानन वायचाळ बोलत होते. अध्यक्षस्थानी युवक भारतीय शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव अॅड. नितीन रावेकर होते. व्यासपीठावर तालुका संघचालक अरविंद हलमारे, नगर कार्यवाह अतुल लोणकर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, असुरी शतिवर सज्जन शतीचा विजय म्हणजे विजयादशमी होय. समाजामध्ये वीरभाव जागृत करण्यासाठी शस्त्रपूजन केले जाते. संघ म्हणजे शाखा, शाखा म्हणजे कार्यक्रम. कार्यक्रमाच्या माध्यमातून व्यती व्यक्तीचे निर्माण केले जाते व हिंदुत्वाचा भाव जागृत केला जातो. समाजामध्ये हिंदूभाव जागृत होणे, हे संघ कार्याचे यश असल्याचे ते म्हणाले.
सुभाषित आदर्श धाबेकर, अमृत वचन श्रेयस पाठक, वैयक्तिक गीत हितेश पैकीने व सांघिक गीत मानसिंग झांझोटे यांनी सादर केले.
यावेळी स्वयंसेवकांनी योगासन, समता, व्यायाम योग, दंड इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय नगर सहकार्यवाह अक्षय लोहकरे यांनी करून दिला. कार्यक्रमापूर्वी शहरातून स्वयंसेवकांनी घोष दलासह पथसंचलन केले. या पथसंचलनाचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.gajanan vaichal कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय गाते, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मंगेश झाडे, वर्धा नागरी बँकेचे संचालक गणेश इंगळे, माजी अध्यक्ष केशव दांडेकर आदींसह मोठ्या संख्येने नागरिक व महिला उपस्थित होते.