सोयाबीन पीक शेतकर्‍यांच्या जिवावर उठले

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
योगेश वरभे
अल्लीपूर,
soybean crop collapses शेतकर्‍यांनी जुने सर्व विसरून नवीन पहाट व नवी स्वप्नं उराशी घेऊन मृग नक्षत्राचे साथीने मोठ्या हिमतीने सोयाबीन बिज मातीत घातले ते कालचे म्हणजे उन्हाळ्यात पेरलेला तिळ अगदी हाताशी येताच. तळपत्या उन्हात दिवस रात्र एक करून दोन चार पोते हाती लागेल. त्यामुळे पुढच भागेल. पण, नियतीला ते मान्य नव्हते. सर्व स्वप्न तेव्हा ही वाहत गेली. मनाला नवीन उभारी देत पुन्हा ३ हजार रुपयांची थैली घेऊन सोयाबीन पेरले तर काय उभ्या पिकाला आग लागावी तसे उभे पीक डोळ्या देखत जळत गेले.
 
 

सोयाबीन  
 
 
काढनीचा खर्च हा उत्पादना पेक्षा जास्त होणार अशी अखेर खात्री झाली अन् उभ्या पिकावर रोटावेटर फिरवावे लागले. आजची हिच दैना सर्वत्र ग्रामीण भागात पहावयास मिळते आहे. एक दोन कंपन्या सोडल्या तर सर्वच कंपन्यांचे बियाणे बोगस आणखी पाणी दुश्मन झाला आणि होत्याच नव्हत पुन्हा तेच झालं.soybean crop collapses पांढर्‍या सोन्याचे सर्व बोंडे सडून कोळसा झाले. सीतादेवीच्या पुजेला पाच गारगोटी तशीच राहिली अन आता पांढर्‍या सोन्याची रीत काळी झाली. खरीपाला आता खिशात दमडी नाही आण हिंमत आता उरली नाही. हेच वास्तव आता सर्वत्र दिसत असुन कसे होणार, काय होणार या प्रश्नाने शेतकरी हवालदिल झाला आहे.