हमासच्या अटकेत असलेल्या एकमेव हिंदू विद्यार्थी होणार अंत्यसंस्कार

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
गाझा,
The only Hindu in Hamas custody हमासच्या अटकेत असलेला नेपाळी हिंदू विद्यार्थी बिपिन जोशी यांचा मृतदेह इस्रायलला परत करण्यात आला आहे. जोशी यांचा अपहरण ७ ऑक्टोबर २०२३ रोजी दक्षिण इस्रायलवर झालेल्या हल्ल्यात झाला होता. हल्ल्यादरम्यान जोशी यांचे शौर्य अद्वितीय होते, त्यांनी अनेक वर्गमित्रांचे प्राण वाचवले. सोमवारी गाझामध्ये झालेल्या युद्धबंदी करारानंतर त्यांचा मृत्यू निश्चित झाला. या संदर्भात इस्रायली लष्कराचे प्रवक्ते एफी डेफ्रिन यांनी सांगितले की, हमासने बिपिन जोशीसह चार ओलिसांचे मृतदेह परत केले आहेत आणि डीएनए चाचणी नंतर त्यांना नेपाळला पाठवले जाईल.
 

The only Hindu in Hamas custody 
 
 
इस्रायली अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, जोशी यांचा मृतदेह तेल अवीव येथे पोहोचवण्यात येत आहे. २२ वर्षीय बिपिन जोशी नेपाळहून गाझा सीमेजवळील किबुत्झ अलूमिम येथे शेती प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गेला होता. तो गाझामध्ये जिवंत असल्याचे ज्ञात असलेले एकमेव गैर-इस्रायली आणि हिंदू ओलीस होता. जेव्हा हमासने हल्ला केला, तेव्हा जोशीने एका जिवंत ग्रेनेडला उचलून बाहेर फेकले, ज्यामुळे अनेक विद्यार्थी वाचले, परंतु त्याचवेळी तो जखमी झाला आणि हमासच्या तावडीत सापडला. इस्रायलमधील नेपाळचे राजदूत धनप्रसाद पंडित यांनी बिपिन जोशी याच्या मृत्यूची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की हमासने सोमवारी रात्री उशिरा जोशी याचा मृतदेह इस्रायली अधिकाऱ्यांना सोपवला असून, नेपाळी दूतावासाच्या सहकार्याने त्याच्यावर अंत्यसंस्कार इस्रायलमध्ये होईल.