नागपूर,
Kojagiri program धनतोली येथील मेजर स्व. देव गार्डनमध्ये कोजागिरीचा रंगतदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम शाखीय सुवर्णकार महिला मंडळाच्या वतीने माया हाडे यांच्या कल्पनेनुसार साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन जया मंगलकार, भारती रोटे माळवी, अर्चना धोटे, चित्रा हर्षे, मोरे आणि शीतल येरपुडे यांनी केले. बगीच्यातील शांत व नैसर्गिक वातावरणात भुलाबाईंची पूजा करून पारंपरिक गाणी गायली गेली. पूजा नंतर आरती प्रसाद दिला गेला.
महिला मंडळाच्या आनंदात भर घालण्यासाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले आणि विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी महिलांनी अल्प आहार घेतला आणि सामूहिक प्रार्थनेत सहभागी होऊन समारोप केला. Kojagiri program सुषमा साकुळकर, अनुपमा हिरुळकर, अंजली रत्नपारखी, रुचिता कुर्वे, सुनीता पाचकवडे, वैशाली निनावे, प्रणया भुजाडे, उमा पाटील, मनिषा डुबे, जयश्री ठाकरे, मंगला मालोकर, शुभांगी अंधारे, कुमुद गायकवाड, संस्कृती माळवी, गीतांजली बनकर व इतर सहभागी महिलांनी कार्यक्रम यशस्वी करण्यात आपला मोठा सहभाग नोंदवला.
सौजन्य: माया हाडे, संपर्क मित्र