अनिल कांबळे
नागपूर,
nagpur-news : वाहतूक नियमानुसार 18 वर्षांखालील मुलांना वाहन चालविण्यास परवानगी नसताना शहरात सर्रासपणे अल्पवयीन मुलांकडून वाहने सुसाट चालवली जात आहेत. त्यातही महाविद्यालय परिसरात अल्पवयीन मुलांकडून दुचाकींचा सर्रास वापर केला जाताे. मात्र, वाहतूक पाेलिसांनी आक्रमक भूमिका घेऊन एका अल्पवयीन मुलाला दुचाकी चालवताना ताब्यात घेतले. त्याच्या पालकाला साेनेगाव पाेलिस ठाण्यात बाेलावून कारवाई करण्यात आली. त्या पालकाला 30 हजार रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला. आतापर्यंत साेनेगाव पाेलिसांनी केलेली ही पाचवी कारवाई आहे.

शहरात अनेक ठिकाणी आणि विशेष करून महाविद्यालय परिसरात 18 वर्षांखालील मुलांकडून ‘50 सीसी’पेक्षा अधिक क्षमतेच्या दुचाकी चालविल्या जात आहेत. या मुलांकडून दुचाकीची रेस करणे, वेगाने चालविणे, माेठ्याने हाॅर्न वाजविणे अशा पद्धतीचे वर्तन केले जाते. त्याचा परिणाम इतर वाहनचालकांवर हाेत असून, अपघातदेखील घडण्याची शक्यता असते. पालकांकडूनच मुलांना अशा पद्धतीची वाहने कशी दिली जातात, असा प्रश्न आहे. यामध्ये वाहन चालविणाèया मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही दंड करण्याची तरतूद आहे. तरीही याची अंमलबजावणी माेठ्या प्रमाणात हाेत नसल्याचे दिसून येते. पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांनी दिलेल्या आदेशानुसार साेनेगाव वाहतूक शाखेचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक प्रवीण पांडे यांनी शनिवारी खामला परिसरात एका अल्पवयीन दुचाकी चालकाला थांबवले. ताे बाराव्या वर्गाचा विद्यार्थी असून नुकताच वाहन चालविणे शिकला हाेता. त्यामुळे त्याला दुचाकी व्यवस्थित चालविता येत नव्हती. त्यामुळे त्याच्या पालकाला पाेलिस ठाण्यात बाेलविण्यात आले. त्यांना मुलाने केलेल्या वर्तनाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर 30 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
काय सांगताे कायदा
माेटार वाहन कायदा 1988 व केंद्रीय माेटार वाहन नियम 1989मध्ये नमूद केल्याप्रमाणे वाहन चालविणाèया 18 वर्षांखालील मुलांसंदर्भात वाहनमालकास शिक्षा करण्याची तरतूद आहे. माेटार वाहन कायदा 1988च्या कलम चार, पाेट कलम (ए) अन्वये सार्वजनिक ठिकाणी ‘50 सीसी’पेक्षा जास्त क्षमतेचे वाहन चालविणाèया व्यक्तीस व कलम 18 अन्वये सार्वजनिक ठिकाणी 20 वर्षांखालील व्यक्तीस व्यावसायिक वाहन चालविण्यास मान्यता नाही. तरीही बिनधास्तपणे अशी वाहने चालविली जात आहेत. यामध्ये मुलींचे प्रमाणही अधिक आहे.
अल्पवयीन मुलांना पालकांनी वाहने चालविण्यासाठी देऊ नये. त्यामुळे स्वतः मुलाच्या आणि पादचाऱ्यांच्या जीवाला धाेका हाेऊ शकताे. दुचाकीचा अपघात झाल्यास माेठे नुकसानही हाेऊ शकते. नियमानुसार अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास दिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
- प्रवीण पांडे (वरिष्ठ पाेलिस निरीक्षक, साेनेगाव वाहतूक शाखा.)