नागपूर,
Dhangar community सकल धनगर समाज, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एस.टी. आरक्षणासंदर्भात विदर्भस्तरीय चर्चासत्र संत गजानन महाराज मंदिर सभागृह, बालाजी नगर येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी आमदार हरिभाऊ भदे यांनी भूषविले. मंचावर पुरुषोत्तम डाखोळे, रमेश पाटील, अनिल ढोले, पांडुरंग खांदवे, वसंतराव आस्कर, रामकृष्ण आस्कर, प्रकाश नवरंगे, वसंतराव ढोके आणि अशोक पातोंड यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
बैठकीत धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळवण्यासाठी पुढील चळवळीबाबत चर्चा झाली. दीपक बोराटे यांच्या उपोषणाचा उल्लेख करत हिवाळी अधिवेशनात मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. Dhangar community आरक्षणाशी संबंधित कायदेशीर व घटनात्मक बाबींवर रामकृष्ण आस्कर आणि अनिल ढोले यांनी मार्गदर्शन केले.शेवटी अध्यक्ष हरिभाऊ भदे यांनी विदर्भस्तरीय नियोजन समिती स्थापन करण्याची आणि जातीनिहाय जनगणनेची मागणी करण्याची गरज व्यक्त केली. आभार प्रदर्शन सरोदे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन पुरुषोत्तम डाखोळे व रमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.
सौजन्य: उज्वल रोकडे, संपर्क मित्र