रानडुकरांच्या उपद्रवात कपाशीचे पीक उद्ध्वस्त

-स्लग - काचनूर येथील शेतकर्‍याचे दीड ते दोन एकरातील नुकसान - शेतातील परिस्थिती पाहून हतबल, कूंपन असतानाही रानडुकरांचा धुडगूस

    दिनांक :14-Oct-2025
Total Views |
खरांगणा-
wild boars crop destroyed यावर्षी सततचा पाऊस, अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातून काही शेतकर्‍यांची पिके बर्‍यापैकी स्थितीत असताना वन्यप्राण्यांच्या धुमाकुळाने पिकांचे नुकसान होत आहे. आर्वी तालुक्यातील काचनूर शिवारात रानडुकरांच्या उपद्रवाने तब्बल दीड ते दोन एकरातील कपाशी जमिनदोस्त झाली. कपाशीची नासाडी पाहून शेतकर्‍याच्या पायाखालची जमिनच सरकली. शेतातील दृश्य हृदय पिळवटून टाकणारे होते.
 
 
रानडुकर हैदोस
 
 
काचनूर येथील सौरभ महेश पुणेवार यांनी तीन एकरात कपाशीची लागवड केली. कपाशीचे योग्य व्यवस्थापन करत मोठा खर्च केला. कपाशीला ४० ते ५० बोंडे होती. त्यांना एकरी २५ ते ३० क्विंटलपर्यंत उत्पादन होण्याची अपेक्षा होती. मात्र ११ ऑक्टोबरच्या रात्री रानडुकरांनी शेतात धुमाकूळ घातला. रानडुकरांच्या उपद्रवात दीड ते दोन एकर शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळच्या सुमारास शेतात गेल्यानंतर त्यांना धक्काच बसला. रानडुकरांच्या उपद्रवाने कपाशीचे मोठे नुकसान झाले. सौरभ पुणेवार यांनी कपाशीवर जवळपास एकरी ४५ हजार रुपये खर्च केला. पण, रानडुकरांनी कपाशीचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसला आहे. सौरभ पुणेवार यांच्या शेतीला सौर कूंपन लावलेले आहे. मात्र त्यानंतरही रानडुकरांनी शेतात धुडगूस घालून पिकांचे नुकसान झाले. नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.
- रानडुकरांच्या उपद्रवाने कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे.wild boars crop destroyed नुकसानीची योग्य भरपाई देण्यात यावी. रानडुकरांचा बंदोबस्त करावा. शेतीला जाळीचे वंâूपन द्यावे, असे सौरभ महेश पुणेवार यांनी सांगितले.
- आर्वी तालुक्यातील उमरी येथेही रानडुकरांच्या उपद्रवात कपाशीचे नुकसान झाले. उमरी येथे मोरेश्वर सिरसाम यांच्या शेतातील कपाशीचेही रानडुकरांनी नुकसान केले. रानडुकरांचा बंदोबस्त करत पीक संरक्षणार्थ वनविभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मोरेश्वर सिरसाम यांनी केली.