ठरलं! भाजपाकडून 'चार राज्यांतील' पोटनिवडणुकांसाठी उमेदवार जाहीर

झारखंडमध्ये चंपई सोरेन यांचे पुत्र बाबूलाल रिंगणात

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
नवी दिल्ली,
BJP bypoll candidates 2025 आगामी विधानसभा पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (भाजप) झारखंड, जम्मू-कश्मीर, ओडिशा आणि तेलंगणा या चार राज्यांतील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या पोटनिवडणुकांमुळे स्थानिक राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
 

BJP bypoll candidates 2025 
झारखंडमधील घाटशिला (अनुसूचित जमातीसाठी राखीव) मतदारसंघातून भाजपने बाबूलाल सोरेन यांना उमेदवारी दिली आहे. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ति मोर्चाचे वरिष्ठ नेते चंपई सोरेन यांचे पुत्र आहेत. यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बाबूलाल यांनी याच मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना झारखंड मुक्ति मोर्चाचे नेते रामदास सोरेन यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता.घाटशिला मतदारसंघात ही पोटनिवडणूक ११ नोव्हेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक रामदास सोरेन यांच्या निधनामुळे होत आहे. ते झारखंडच्या हेमंत सोरेन सरकारमध्ये शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री होते. २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत रामदास सोरेन यांनी बाबूलाल सोरेन यांना तब्बल २२,४४६ मतांनी पराभूत केले होते. रामदास सोरेन हे २००९ आणि २०१९ मध्येही याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते.
 
 
दरम्यान, BJP bypoll candidates 2025  जम्मू-कश्मीरमध्ये दोन विधानसभा मतदारसंघांवर पोटनिवडणूक होणार आहे. बडगाम मतदारसंघातून भाजपने आगा सैयद मोहसिन यांना उमेदवारी दिली असून नगरोटा मतदारसंघातून देवयानी राणा यांना रिंगणात उतरवले आहे. बडगाममधील जागा उमर अब्दुल्ला यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाली होती. त्यांनी आपला गंदरबल मतदारसंघ कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. तर नगरोटामध्ये भाजपचे आमदार देवेंद्र सिंह राणा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. राणा यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार जोगिंदर सिंह यांचा तब्बल ३०,४७२ मतांनी पराभव केला होता.
ओडिशाच्या नुआपाडा मतदारसंघातून भाजपने जय ढोलकिया यांना उमेदवारी दिली असून, तेलंगणाच्या जुबली हिल्स मतदारसंघातून लंकाला दीपक रेड्डी यांना उमेदवार म्हणून उभे केले आहे.या पोटनिवडणुकांची मतदान प्रक्रिया ११ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. देशातील सात राज्यांतील एकूण आठ विधानसभा जागांसाठी या निवडणुका होणार असून, राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. राज्यनिहाय राजकारणात या निकालांचा मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, भाजप आणि विरोधक दोघांसाठीही ही एक मोठी परीक्षा असणार आहे.