जुन्या वादातून जिवे मारण्याचा प्रयत्न

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
आरोपीला एका तासात केले जेरबंद

यवतमाळ, 
Accused arrested मंगळवार, १४ ऑक्टोबरला दुपारी ४ च्या सुमारास त्यांचा मुलगा शेख सज्जाद शेख अकबर (वय २८) यास त्याच्याच घरासमोर राहणारा जावेद शाह यासीन शाह ४०) व त्याचा भाचा गुड्डूतात्या उर्फ मोहम्मद अहेफाज मोहम्मद जावेद (वय २५) यवतमाळ यांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार शहर पोलिस ठाण्यात शेख अकबर शेख रोशन यांनी दिली. कुंभारपुरा येथील कब्रस्थानच्या गेटसमोर त्याच्यासोबत जुन्या भांडणावरून जाणीवपूर्वक वाद करून त्याला जिवाने मारण्याच्या उद्देशाने जावेद शहा याने लोखंडी पाईपने आणि अहेफाज याने चाकूने पोटात व शरीरावर इतर ठिकाणी वार करून शेख सज्जाद याला जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न केला.
 
 
aropi
 
Accused arrested जखमीच्या वडिलांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात जावेद शाह यासीन शाह आणि मोहम्मद अहेफाज मोहम्मद जावेद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३ (५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्ह्याची गंभीरता घेता ठाणेदार रामकृष्ण जाधव यांनी डीबी पथकास त्वरित कामी लावले. पथकातील सहपोलिस निरीक्षक मिलींद सरकटे, उपनिरीक्षक गणेश सपकाळ, रावसाहेब शेंडे, प्रदीप नाईकवाडे, गौरव ठाकरे, पवन नांदेकर, अभिषेक वानखडे यांनी तत्काळ सावरगडमध्ये लपून बसलेला एक आरोपी मोहंमद अहेफाजला एका तासात अटक केली.