वणी :
तालुक्यातील उमरीचे सरपंच व संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुकाराम माथनकर यांना Adarsh Sarpanch Puraskar आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. नालंदा ऑर्गनायझेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदर्श सरपंच हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे येथे पार पडला.
नालंदा ऑर्गनायजेशन संस्थेकडून सर्वेक्षणादरम्यान ‘महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२५’ साठी उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या वतीने हा प्रदान करण्यात आला. Adarsh Sarpanch Puraskar आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल तुकाराम माथनकर यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.