अभाविपचे औद्योगिक संस्थेत मागण्यांचे निवेदन

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
वणी, 
Akhila bharatiya vidyarthi parisada vani अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वणी शाखेतर्फे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्यांना विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या विविध मूलभूत समस्यांबाबत निवेदन देण्यात आले. या समस्या न सोडवल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संस्थेतील अनेक गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यात पिण्याच्या पाण्याची समस्या, शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे, याकडे लक्ष वेधले. स्वच्छतागृहाची दयनीय स्थिती, नियमित साफसफाईचा अभाव, तुटलेले नळ व दरवाजे, वर्कशॉपमधील कबुतरांची समस्या, कबुतरांच्या विष्ठेमुळे अस्वच्छता व आरोग्याचा धोका, महाविद्यालय परिसरात वाढलेले साप, कीटक आणि डासांचा त्रास वाढल्यामुळे परिसर असुरक्षित बनला आहे.
 
 
abvp
 
कर्मशाळेमध्ये मशिनरींची अनुपलब्धता, काही ट्रेडसाठी आवश्यक मशिन्स कार्यरत नसल्याने प्रात्यक्षिक प्रशिक्षणावर परिणाम होत आहे. कॉलेजमधील काही वर्गखोल्यांची स्थिती अत्यंत निकृष्ट असून पंखे, दिवे या किमान सोयीसुद्धा उपलब्ध नाहीत. Akhila bharatiya vidyarthi parisada vani अभाविप प्रतिनिधींनी प्रशासनाकडे या समस्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. आरोग्य, स्वच्छता आणि शैक्षणिक सोयीसाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रसंगी महाविद्यालय मंत्री ऋतिक वांढरे, वणी नगरमंत्री आयुषी फुलेवार, नगर सहमंत्री क्रिश घुले, विभाग संयोजक नीरज चौधरी, जिल्हा संघटनमंत्री वैभव वाघमारे, रुद्राक्ष कनाके, वैष्णवी बुरडकर तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.