विद्यार्थिनीचे अपहरण करून अत्याचाराचा प्रयत्न

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
अनिल कांबळे 
नागपूर, 
attempted-kidnapping-rape : एका कुख्यात गुन्हेगाराने अल्पवयीन विद्यार्थिनीचे तिच्याच घरातून अपहरण करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. इमामवाडा पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या घटनेमुळे शहरातील महिला-मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
 
 
 

NGP 
 
 
 
साहिल विजय गायकवाड (30, इंदिरानगर) असे आराेपीचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वीसुद्धा लैंगिक अत्याचार केल्याचे गुन्हे दाखल हाेते. त्याची 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला ताे ओळखत हाेता. त्याने तिला 12 ऑक्टाेबरच्या रात्री जबरदस्ती स्वत:च्या घरी नेले. तिथे त्याने तिच्याशी गैरवर्तन केले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विद्यार्थिनी घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी शाेध घेतला. मात्र, ती न आढळल्याने पाेलिस ठाण्यात तक्रार केली. पाेलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता तिचे माेबाइल फोन लाेकेशन ट्रेस केले. त्यात ती विद्यार्थिनी साहिलच्या घरी असल्याचे उघड झाले. पाेलिसांनी तात्काळ साहिलच्या घरी धाड टाकून विद्यार्थिनीची सुटका केली. साहिलला अटक करण्यात आली आहे आणि त्याच्याविराेधात अपहरण, विनयभंग आणि पाेक्साे (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.