अफगाणिस्तानला चीनचे समर्थन...तर पाकिस्तानला धक्का

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
बीजिंग,
China's support for Afghanistan अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेजवळील संघर्षामुळे दक्षिण आशियात तणाव वाढला आहे. बुधवारी पहाटे कंधार प्रांतातील स्पिन बोल्दाक आणि शोराबाक भागात पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला, ज्यात १२ अफगाण नागरिक ठार झाले आणि १०० हून अधिक जखमी झाले. अफगाण तालिबान सरकारने या हल्ल्याचे जोरदार निंदा केली आहे. चीनने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचे स्पष्ट समर्थन जाहीर केले आहे, ज्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे राजदूत झाओ जिंग यांच्याशी बैठक घेऊन पाकिस्तानच्या हल्ल्याबाबत माहिती दिली. चीनने अफगाणिस्तानच्या प्रतिक्रिया आणि राष्ट्रीय सार्वभौमत्वाबाबत आदर व्यक्त केला आणि तालिबानला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
 

China
 
चकमकीदरम्यान पाकिस्तानी सैन्याने स्पिन बोल्दाक आणि शोराबाकमध्ये हवाई हल्ले केले, ज्यामुळे नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले. पाकिस्तानी माध्यमांनी दावा केला की या हल्ल्यात १०-१५ तालिबानी सैनिक मारले गेले. अफगाण सैन्याने लगेचच प्रत्युत्तर दिले, परिणामी मोठ्या संख्येने नागरिकांना घर सोडावे लागले. दरम्यान, रशियाने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही देशांना राजकीय मार्गाने मतभेद सोडवण्याचे आवाहन केले असून, दहशतवादविरोधी आणि प्रादेशिक सुरक्षा मुद्यांवर लवकरच संवाद सुरू होईल अशी आशा व्यक्त केली आहे.