सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

समरसता मंचाच्या वतीने दिले निवेदन

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
bhushan-gavai : यवतमाळ विभागाच्या सामाजिक समरसता मंचाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर राकेश किशोर या व्यक्तीने हल्ल्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अतिशय दुर्दैवी, असंवैधानिक व निंदनीय आहे, असे मत व्यक्त करून तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
 
 
gavai
 
 
 
देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रमुखांवर अशा प्रकारचा अवमानकारक हल्ल्याचा प्रयत्न केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून, तो भारतीय न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवरचा गंभीर आघात आहे. भारतीय लोकशाहीत मतभेद, निषेध व्यक्त करण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. अशा प्रकारे हल्ला करणे असंविधानिक, असभ्य व अवमानजनक कृत्य आहे, असे मंचाने म्हटले आहे. सुबुद्ध भारतीय नागरिक या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करत आहेत. काही समाजद्रोही, फुटीरतावादी तसेच राजकीय शक्ती या घटनेच्या माध्यमातून समाजात द्वेष व जातीय, धार्मिक तेढ निर्माण करत आहेत, याचाही आम्ही निषेध करतो. हा प्रकार कोणत्याही धर्म किंवा समाजाशी संबंधित नसून विकृत व असंवैधानिक मानसिकतेचा परिणाम आहे, असेही मंचाने म्हटले आहे.
 
 
संस्थेचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे आम्ही, विवेक विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीने या घृणास्पद कृत्याचा अत्यंत तीव शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंचाने केली आहे.
 
 
सरन्यायाधीश यांनी जरी कारवाई करण्याचे निर्देश दिले नसले तरी सरकारने स्वतःहून गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस बळकट सुरक्षा व्यवस्था व आवश्यक उपाययोजना कराव्या, अशी मागणी यवतमाळ विभाग सामाजिक समरसता मंच, विवेक विचार, अनुलोम संस्था यवतमाळ, अधिवक्ता परिषदेने निवेदनातून केली आहे. यावेळी राट्रीय स्वयंसेवक संघाचे यवतमाळ विभाग कार्यवाह अंकुश रामगडे, प्रांत संयोजक समरसता मंच आनंदीदास पाळेकर, समरसता मंचाचे उदय महाजन, संग्राम ककने, अनुलोमचे बाळासाहेब राऊत, अधिवक्ता परिषदेचे अ‍ॅड. जीवन लढी उपस्थित होते.