तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Deepak Gharjode : मुंबई येथे पार पडलेल्या एका भव्य सोहळ्यात आयुष इंटरनॅशनल महासंघातर्फे डॉ. दीपक घरझोडे यांना ‘आयुष महासन्मान पुरस्कार 2025’ ने गौरविण्यात आले.
हा सन्मान डॉ. घरझोडे यांना नैसर्गिक उपचार (निसर्गोपचार) आणि योगिक सायन्सचा उपयोग करून ऑटिझम व बाल मानसिक विकारग्रस्त मुलांच्या उपचार आणि पुनर्वसन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रदान करण्यात आला. त्यांच्या कार्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात तसेच सामाजिक पातळीवरही सकारात्मक बदल घडवून आणण्यात यश मिळाले आहे.
ऑटिझमग्रस्त मुलांच्या समुपदेशन, प्रशिक्षण आणि कुटुंबांना आधार देण्याच्या त्यांच्या उपक्रमाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे. या सन्मान सोहळ्यात आरोग्य क्षेत्रातील नामवंत तज्ञ, आयुष चिकित्सक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. हा सन्मान त्यांना आरोग्य भारतीचे सचिव डॉ. अनिल आखरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ. घरझोडे यांच्या या सन्मानामुळे यवतमाळ जिल्ह्याचा तसेच विदर्भाचा अभिमान वाढला आहे.