तभा वृत्तसेवा
आर्णी,
farm-laborer-commits-suicide : शेतात सालगडी म्हणून काम करणाèया शेतमजुराने आर्णीतील आमणी शेतशिवारातील शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, 14 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजता उघड झाली. आत्महत्या करणाèया शेतमजुराचे नाव ज्ञानेश्वर श्यामराव मेश्राम (वय 52, अशोकनगर, नेर) असे आहे.
तक्रारकर्ता शेख रशीद शेख इसाक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी शेख मोईन शेख हुसेन यांच्यासोबत प्रवीण चलने यांचे शेत मक्त्याने करतो. या शेतात सालगडी म्हणून ज्ञानेश्वर मेश्राम यास पाच महिन्यांपूर्वी कामावर ठेवले होते. तो काम करून शेतातील कोठ्यातच राहात होता.
मंगळवारी सकाळी 7 च्या दरम्यान मी शेतात गेलो असता माझा सालगडी ज्ञानेश्वर मेश्राम याने शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने फाशी घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. मृतक ज्ञानेश्वरच्या खिशात चिठ्ठी मिळाली. ती पोलिसांनी जप्त केली आहे. घटनास्थळ पंचनामा जमादार अरविंद जाधव, पवन गादेकर, अरविंद जाधव यांनी केला. पुढील तपास ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
मृतकाच्या चिठ्ठीत...
मृतक ज्ञानेश्वर मेश्राम याच्या खिशात एक चिठ्ठी मिळाली असून त्यात, मला 4 महिन्यांपासून पैसे मिळाले नाहीत, अशा अर्थाचा मजकूर आहे. यामुळे ज्ञानेश्वरने मजुरी न मिळाल्याने आत्महत्या केली का, असा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिस तपास त्या दिशेने होणार आहे.