शेतकर्‍याची मृत्यूशी झूंज संपली

    दिनांक :15-Oct-2025
Total Views |
वर्धा, 
farmer-suicide यंदा अतिवृष्टीने पिकांना भुईसपाट केले. त्यामुळे नातेवाईकांसह बँकेकडून घेतलेले कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत विवेक घोडमारे रा. वायफड या शेतकर्‍याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच नातेवाईकांनी सावंगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, १५ दिवसांच्या उपचारानंतर अखेर त्याची प्राणज्योत मालवली.
 
 
farmer-suicide
 
पुलगाव नजीकच्या वायफड येथील विवेक घोडमारे यांनी तीन आठवड्यांपूर्वी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना अत्यवस्थेत सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. farmer-suicide दरम्यान, आज बुधवार १५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. विवेक घोडमारे यांच्यावर आधीच बँकेचे कर्ज होते. उसणवारी करून त्यांनी खरीपाची तयारी केली होती. पावसामुळे घरही पडल्याने तो नातेवाईकांकडे राहत होता. त्यामुळे बँकेचे कर्ज आणि नातेवाईकांकडून घेतलेले व्याजाचे पैसे कसे फेडायचे, या विवंचनेत होता. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी आहे.